जागतिक वनसंवर्धन दिनानिमित्त घोडेगाव येथे वृक्षारोपण

घोडेगाव- आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, घोडेगाव तसेच ग्रामपंचायत, घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष संवर्धन जनजागृती आणि वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार (दि.२२ ) रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये घोडेगाव नगरीच्या आदर्श सरपंच मा.सौ.क्रांती ताई गाढवे, उपसरपंच मा.श्री.सोमनाथ भाऊ काळे, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय अजित दत्तात्रय काळे, उपाध्यक्ष श्री तुकाराम काळे, संस्थेचे समन्वय समितीचे चेअरमन मा.श्री. नवनाथ आप्पा काळे,घोडेगावचे धडाडीचे पत्रकार श्री. मोसीन काठेवाडी, त्याचप्रमाणे विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसूजा, उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी, घोडेगाव महिला राष्ट्रवादीचे कार्यकुशल नेतृत्व माधवी कर्पे,कार्यकर्त्या अंजली आंधळे ,पर्यवेक्षिका श्रीमती वंदना म्हसे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.

या कार्यक्रमात सरपंच सौ क्रांतीताई गाढवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,केवळ वृक्षारोपण करून काही साध्य होणार नाही. लावलेल्या झाडांचे संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपण लावलेल्या झाडांची काळजी घेणेदेखील तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी वेळोवेळी खत पाणी देणे गरजेचे राहील. केवळ उपदेश न करता प्रत्यक्ष कृती करूनच आपल्याला वृक्ष संवर्धन करता येईल. तसेच प्राचार्या डिसूजा मॅडम यांनी पण सांगितले की, आपण पाणी वीज कागद यांचं जेव्हा संवर्धन करतो त्यावेळी अप्रत्यक्षरीत्या आपण झाडांचेही संवर्धन करत असतो. त्यामुळे वृक्ष संवर्धना बरोबरच वरील बाबींचेही संवर्धन होणं आवश्यक आहे.

उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते घोडेगावच्या स्मशान भूमी परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी गावातून फेरी काढली होती.विविध घोषणा देऊन वृक्ष संवर्धनासाठी संदेश दिला. त्यासाठी विद्यार्थ्यांना श्रीमती सोनीका मस्करेनास, श्री.कैलाश जाधव, श्री चेतन पोखरकर, श्री समीर मुजावर, श्री संदीप सोमवंशी, श्री तानाजी फुलमाळी इत्यादी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी घोडेगाव ग्रामपंचायतीकडून विद्यालयाला अनेक रोपं उपलब्ध करून देण्यात आली.यामध्ये विशेष करून श्री सोमनाथ काळे यांनी पुढाकार घेतला. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे सदस्य देखील उपस्थित होते.

लोकसहभागातून स्मशानभूमीचा कशाप्रकारे कायापालट करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती सरपंच सौ क्रांती ताई गाढवे यांनी दिली. त्यांनी सांगितले की हा जो काळा पालट झालेला आहे यामध्ये मोलाचे श्रेय आहे ते म्हणजे उपसरपंच श्री सोमनाथ काळे व आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष श्री तुकाराम काळे यांचे यांच्या बहुमोल सहकार्यामुळेच स्मशानभूमीचे सुशोभीकरण साध्य होऊ शकले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा पोखरकर हिने केले, तर आभार प्रदर्शन विद्यालयाचा विद्यार्थी कुमार अमन पठाण याने केले.

Previous articleटीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांची दुर्ग कलावंतीण, प्रबळगड आणि इर्षाळगड एकाच दिवशी सर करुन लोकमान्य टिळकांना अनोखी मानवंदना
Next articleआदिवासीचे प्रश्न कोणापुढे मांडायचे…? नामदेव भोसले