आदिवासीचे प्रश्न कोणापुढे मांडायचे…? नामदेव भोसले

उरुळी कांचन

आदिवासी समाज बांधवांचे प्रश्न आजही आहे तसेच असून आदिवासी समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा अद्यापही प्रयत्न होत नाही. शिवाय सध्याच्या आधुनिक युगात आदिवासी समाज बांधवांना अशिक्षित असल्यामुळे कायदा सुव्यवस्था याची फारशी माहिती नाही त्याचा गैरफायदा इतर जन घेत असून यावर पोलीस दलानेही आदिवासी बांधवांना कायद्याची जान करून देण्यासाठी आदिवासी पाड्यांमध्ये, गावांमध्ये जनजागृती किंवा प्रबोधन शिबिर कायद्याविषयी आयोजित करावेत, अशा विविध मागण्या संदर्भात आदिवासीसंघ व चर्मकार विकास संघाचे पदाधिकारी यांनी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची भेट घेतली व त्यांना सविस्तर चर्चा करून या संदर्भात नामदेव भोसले यांनी विनंती केली.

आदिवासी समाजाला कायद्याविषयी ज्ञान प्रबोधन व्हावे. त्यांचा विकास व्हावा. यासाठी सर्व थरातून प्रयत्न होणे गरजेचे असून पोलीस दलानेही असा प्रयत्न करावा.

यासाठी आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले, तुषार नामदेव इनामके, पोपटराव ताम्हणे, पत्रकार अमर झिंजुर्डे, राजेंद्र टिळेकर आदींनी संगमनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांचा उपस्थितांकडून सत्कार करण्यात आला व साहित्यिक नामदेव भोसले लिखीत मराशी हे पुस्तक भेट देण्यात आलं यावेळी संगमनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी कार्यकर्तेही उपस्थित होते.

Previous articleजागतिक वनसंवर्धन दिनानिमित्त घोडेगाव येथे वृक्षारोपण
Next articleआदिवासी अन्न वस्त्र निवारा पासुन वंचित- मधुकर पिचड