कनेरसर येथील शाळेतील मुलांना वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

राजगुरूनगर – कनेरसर गावचे माजी उपसरपंच श्री. प्रदीप ज्ञानेश्वर म्हसुडगे यांनी मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना,१०० सचित्र बालमित्र पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्याचा उपयोग मुलांना पाढे पाठांतर,शब्द,वाक्ये वाचन लेखनासाठी भरपूर सराव करता येईल. व मुलांचे लेखन, वाचन सुधारेल पाढे पाठांतर केल्याने गणिती क्रिया करणे सोपे होईल.व शालेय गुणवत्ता साठी उपयोग होईल.असे शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ चेंडीराम गावडे सर यांनी सांगितले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास कनेरसर केंद्रप्रमुख मा.श्री.बाळासाहेब गावडे साहेब, मुख्याध्यापक श्री. नानाभाऊ गावडे सर,श्री बबनराव रेटवडे सर,श्री.दत्तात्रय गायकवाड सर,श्री. काळूराम गोरडे सर ,श्री.अशोक सोनवणे सर,श्री.महेंद्र पवार सर, श्रीम.अंजली शितोळे मॅडम, श्रीम. सारिका राक्षे मॅडम, श्रीम.शुभांगी जाधव मॅडम,श्रीम.विदया बनकर मॅडम, श्री. संदिप म्हसुडगे सर,कु.स्वराज म्हसुडगे.सौ.सुमन दौंडकर, सौ.अलका बोरकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीम. सारिका राक्षे मॅडम यांनी केले.सूत्रसंचालन श्रीम.शुभांगी जाधव मॅडम यांनी केले.आभार श्रीम.अंजली शितोळे मॅडम यांनी मानले.

Previous articleजिद्द ,चिकाटी अन् प्रामाणिक कष्टाच्या जोरावर शेतकऱ्यांचा मुलगा बनला ‘ सीए ; वाकी बु’ गावच्या शिरपेचात मानाचा तुरा
Next articleनिधन वार्ता – ज्ञानेश्वर साकोरे यांचे निधन