जिद्द ,चिकाटी अन् प्रामाणिक कष्टाच्या जोरावर शेतकऱ्यांचा मुलगा बनला ‘ सीए ; वाकी बु’ गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

चाकण – घरची परिस्थिती कोणत्याही स्वरुपाची असली तरी मुलांना स्पर्धा परीक्षांचे लागलेले व्यसन शांत बसू देत नाही . अभ्यासात सातत्य अंगी जिद्द , चिकाटी , प्रामाणिक कष्ट घेतले तर यश नक्कीच मिळते .याचे उत्तम उदाहरण म्हणजे सीए ( सनदी लेखापाल ) परीक्षा पास होऊन खाजगी कंपनीत व शेती काम करणाऱ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत वाकी बु।। व परिसरातील गावातील पहिला सीए बनण्याचा मान मिळवला आहे . तो म्हणजे वाकी बु।। ( ता.खेड जिल्हा .पुणे ) येथील माऊली राघू कड याने विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना संघर्षाची तयारी ठेवावी लागते . त्यातून यश नाही आले तर नैराश्य देखील येते . मुलांना यासाठी कौटुंबिक आधाराची फार मोठी गरज असते .वाकी बु।। खाजगी कंपनीत काम करत असताना राघू कड यांनी देखील आपल्या मुलाच्या उज्वल भविष्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली . अगदी शालेय जीवनापासूनच त्याच्या बौद्धिक क्षमतेला वाव देत ध्येयाप्रत नेण्याची भुमिका उत्तम प्रकारे पार पाडली आहे

माऊली कड याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलपिंपळगाव येथे झाले असून बहुळ येथे माध्यमिक शिक्षण तर उच्च शिक्षण पुणे येथे झाले आहे . सीए परीक्षेचा सलग आठ वर्ष अभ्यास करत दुसऱ्या प्रयत्नात त्याने हे दैदिप्यमान यश संपादन करत गावातील पहिलाच सीए बनण्याचा बहुमान मिळवला आहे .

यावेळी खासदार अमोल कोल्हे ,आमदार दिलीपशेठ मोहिते , सरपंच पप्पूदादा टोपे, डॉ दादासाहेब गारगोटे संतोष टोपे , उपसरपंच विश्वास टोपे ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब गारगोटे यांनी त्याचे कौतुक केले तर सन्मान खेड तालुक्याचे युवा नेते रोहनभैया मोहिते, चेयरमन सोमनाथ टोपे, व्हा चेयरमन धनंजय कड , निलेश कड , करण्यात आला असून यशाबद्दल संपूर्ण परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

Previous articleकंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरणार :भारतीय मजदूर संघ
Next articleकनेरसर येथील शाळेतील मुलांना वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप