कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

अतुल पवळे,पुणे जिल्हा प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन प्रभाग क्र ३२ , वारजे माळवाडी वतीने कोरोना कोवीड १९ या महाभयानक रोगराईच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कसल्याही सत्तेचा दुरवर संबंध नसताना केवळ सामाजिक बांधिलकी म्हणुन गरजवंत लोकांना जेवण , कोरडा शिधा , अर्सेनिक अल्बम गोळ्या , मास्क , औषधे फवारणी आदी कामामध्ये सहभाग घेऊन समाजाप्रती आपले कर्तव्यात कुठेही कमी पडले नाहीत अश्या सर्वाचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मान केला गेला .

या कार्यक्रमात पैंगबर शेख, आलम पठाण सोशल मिडिया फाऊंडेशन, ऋतृराज दिक्षीत, सचिन सावंत आरोग्य निरीक्षक , पुणे मनपा ,पराग ढेणे सामाजिक कार्यकर्ता, अक्षय बराटे ऋणानुबंध संस्था ,डाॅक्टर राजेंद्र खेडेकर श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट , तुफैल शेख , सरफराज सय्यद हेल्पींग हॅन्डस् फाऊंडेशन जावेद शेख ,रफीक शेख , ऊम्मेद जांगिड आदींचा कोरोना योध्दा म्हणुन सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्रक , शाॅल , फुल देऊन यथोचित सन्मान करण्यात आला .

याप्रसंगी मा. सचिनभाऊ मोरे , अध्यक्ष खडकवासला भाजपा , मा. किरण बारटक्के , चिटणीस , पुणे भाजपा , मा.अरविंद जोशी , रेणुका मोरे , वर्षा पवार , परशुराम पुजारी , अमजद अन्सारी , किरण साबळे , आनंद देशपांडे यांचेसह संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट ,स्वीकृत सभासद यांनी केले होते.

Previous articleस्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मराठा मावळा जवान संघटनेच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलीसांना सेफ्टी किटचे वाटप
Next articleस्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून छावा क्रांतिवीर सेनेचे खडकवासला मतदार संघात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन