स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून छावा क्रांतिवीर सेनेचे खडकवासला मतदार संघात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अतुल पवळे ,पुणे जिल्हा प्रतिनिधी– प्रेरणादायी संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांच्या आदेशाचे पालन करत, केंद्रिय अध्यक्ष प्रताप सिंह कांचन पाटील यांच्या सूचनेवरून सामाजिक बांधिलकी समाजाची जाणं याचे भान ठेवत आपणही देणं लागतो या महाराष्ट्राच्या मातीचे या सर्व गोष्टींचा विचार करत सामान्य गरीब जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी 15 ऑगस्ट चे औचित्य खडकवासला मतदार संघात छावा क्रांतिवीर सेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विशाल भाऊ गव्हाणे, पुणे जिल्हा अध्यक्ष सागरभाऊ भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

या उदघाटन समारंभाला प्रमुख उपस्थित छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश युवा उपाध्यक्ष राजाभाऊ पवार, प्रदेश युवा महिला आघाडी अध्यक्ष छायाताई खैरनार ,ख.म.संघ.महिला अध्यक्ष स्वप्नाताई लांडगे उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मा. दत्तात्रय भोंडवे साहेब, शिवसेनेचे ख.म.संघ अध्यक्ष नितीनदादा वाघ, तसेच हवेली उपतालुका प्रमुख संतोष दादा शेलार याची लाभली.

आपल्या विभागात सामान्य गरीब जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी या सिहंगडाच्या पायत्याशी छत्रपतींचे मावळे आहेत छावा क्रांतिवीर सेनेच्या रूपाने त्यांचं आस्तिस्व आहे यासाठी जनसंपर्क कार्यालय आपण चालू केले आहे असे मत प्रदेश प्रवक्ता गणेश राऊत यांनी व्यक्त केले.

यावेळी पुणे जिल्हा विध्यार्थी आघाडी अध्यक्ष राजू फाले विजयजी शिंदे जिल्हा अध्यक्ष ग्रामीण निकेत कासार,पुणे शहर अध्यक्ष बिपीन दिवेचा, पुणे शहर उपाध्यक्ष रवी सातपुते, राजू संपकाल, ओंकार सणस,अमित सोनवणे, सौरव रायरीकर, प्रतीक गायकवाड, विजयभाऊ जरे, अजित नारोटे, सागर मोरे, अक्षय मोरे, प्रशांत सोनवणे, तानाजी लांडगे विशाल मानकर, संतोष छपरे हे सर्व पदाधिकारी उपस्तीत होते.

जनसंपर्क कार्यालयाचे नियोजन छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश प्रवक्ता जनसेवक गणेश राऊत व कार्याध्यक्ष संदीपभाऊ वांजळे यांनी केले.

Previous articleकोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान
Next articleरोजगार हमी मजूर ते चित्रपट,मालिका निर्माता, अभिनेता सचिन शिंदे या ध्येयवेड्या तरूणाचे स्वप्न साकार