छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त युगप्रवर्तक प्रतिष्ठाणच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

घोडेगाव- पेठ (ता आंबेगाव )येथील सामाजिक न्याय विभागाची अनु जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त सामाजिक समता दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष गौतम खरात बोलत होते.

तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम विमल खाडे प्रमुख उपस्थित म्हणून टी एस नागरी पत संस्थेचे व्हा चेअरमन पुरुषोत्तम फदाले ,जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्यायचे माजी जिल्हाध्यक्ष गौतमराव रोकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोहत्सव कमिटीचे तालुका अध्यक्ष अमित रोकडे ,भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष किशोर वाघमारे जितेंद्र खोसे सर, गोडे मॅडम श्रीम शामराज मॅडम,श्रीम सय्यद मॅडम,श्रीम खाबूतरे मॅडम श्री साबळे सर व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी प्रथम पाहुण्याच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी युगप्रवर्तक प्रतिष्ठाण च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना दप्तर,वह्या पेन वाटप करण्यात आले तर शाळेचा एस एस सी चा १००% निकाल लागल्या बद्दल युगप्रवर्तक प्रतिष्ठाण च्या वतीने सन्मान चिन्ह शाल व श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन पाहुण्याच्या हस्ते मुख्यध्यपिका शिक्षक व कर्मचारी व विदयार्थी यांचा सन्मान करण्यात आला.समता दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा याही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

राजश्री शाहू महाराज यांची जाती निर्मूलना बाबत ची दूरदृष्टी असामान्य असे गौरवोदगार युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष गौतम खरात यांनी काढले .शिक्षण,अस्पृश्यता निवारण, जातीव्यवस्था निर्मूलन आशा अनेक विषयात राजश्री शाहू महाराज यांनी आदर्शवत कामगिरी करून लोककल्याणकारी राजा म्हणून नाव लौकिक मिळवला आहे

प्रास्ताविक श्री जितेंद्र खोसे सर यांनी केले सूत्रसंचालन श्रीम मुळे मॅडम यांनी केले तर आभार श्री कोयतेसर यांनी मानले…व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Previous articleआगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ९ पैकी ९ जागा जिंकणार – आ. अतुल बेनके
Next articleआंबेगाव तालुक्यात रेशनिंग कार्डधारकांना मागिल दोन ते तीन महिन्यांपासून अनेक अडचणीं- डॉ. निलम गावडे