कासुडी॔ ते कवडीपाट एक्स्प्रेस हायवेवरील साईडपटयावरील माती काढण्याच्या कामात ठेकेदाराकडून हलगर्जीपणा – सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे

 कुरकुंभ : प्रतिनिधी, सुरेश बागल

दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने कासुडी॔ टोलनाका ते कवडीपाट टोलनाक्यापर्यंत एक्स्प्रेस हायवेवरील दोन वर्षांपासून दुर्लक्षित – प्रलंबित कामे ७ ते ८ दिवसांपासून कवडीपाट टोलनाक्यापासून चालू केलेली आहेत. त्यासाठी ३ ते ४ महिन्यांपासून  सामाजिक कार्यकर्ता उमेश महादेव म्हेत्रे व किशोर वचकलनी तहसीलदार कचेरी, सार्वजनिक बांधकाम विभाग NHAI, ग्रामपंचायत विभाग, तसेच जिल्हा प्रशासनाबरोबर पाठपुरावा करण्याचे काम केलेलं आहे. त्या कामाला यश आलेले आहे. पण ज्या ठेकेदाराने काम घेतलं आहे ते ठेकेदार किशोर बारगे यांना सकाळी भेटून रस्त्यावरील झुडपे, लोखंडी जाळ्या व्यवस्थित करण्याचे काम ठेकेदाराने केलेलें आहे. पण एक्स्प्रेस हायवेवरील साईडपटयावर भरपूर प्रमाणात  झाडांच्या फांद्या व माती अर्धवट काढल्यामुळे तसेच पावसाळा असल्याने साईडपटयावर चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तरीही  उमेश म्हेत्रेनी व किशोर वचकलनी व्यवस्थित सर्व माती बाजूला करण्यासाठी ठेकेदार किशोर बारगे यांना विनंती केली पण ठेकेदार पालखी गेल्यावर हे माती बाजूला करण्याचे काम मी करतो अशी उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागला, ‌तसेच कासुडी॔ टोलनाक्यावर डांबरी रस्त्यांची दुरवस्था झालेली होती तेथे  डांबर  टाकून रस्ता व्यवस्थित कराव्यात यावा अशी विनंती केली आहे.

तसेच दुपारी ३:००वाजता  तहसीलदार कार्यालय दौंड याविषयीचे निवेदन दिलेले आहे .व यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार साहेबांना निवेदन दिले तरीही ठेकेदार किशोर बारगे यांनी त्यांचा मी पणा कमी करून  तातडीने रस्त्याच्या साईडपटयावरील माती ,कामगार वाढवून लवकरच बाजूला करावी. विनंती करून सुद्धा ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे येत आहेत. प्रशासनाने पालखी येत असल्यामुळे सहकार्य करण्यास मदत करावी अपूर्ण काम पूर्ण न झाल्यास  २४-६-२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता कासुडी॔ टोलनाका येथे  सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे व किशोर वचकल आंदोलन करणार आहे.

Previous articleकोरेगावमुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सचिन निकाळजे यांची निवड
Next articleप्रा. कैलाश महानोर यांना समाजभूषण पुरस्कार