प्रा. कैलाश महानोर यांना समाजभूषण पुरस्कार

योगेश राऊत ,पाटस

पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर विकास प्रतिष्ठान बारामती आयोजित २९७जयंती निमित्त बारामती येथे संपन्न झाली. यावेळी जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवुकीत राज्यातील विविध ठिकाणाहून नेते व कार्यकर्ते व समाज बांधव पक्षपात सोडून सहभागी झाले होते.या निमित्ताने विशेष योगदान बद्दल राज्यातील आताच झालेल्या एम. पी. एस. सी, यू.पी. एस. सी परीक्षेत नाविन्य पूर्ण यश मिळवल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी राजमंत्री तथा सोलापूर पालक मंत्री नामदार मा. दत्तात्रय मामा भरणेसाहेब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी पालक मंत्री नामदार मा. धनंजय मुंडेसाहेब , मा. विश्वास नाना देवकाते पाटील मा. अध्यक्ष जिल्हा परीषद पुणे, मा. सौ. रुपाली ताई चाकणकर अधक्ष्या महिला आयोग महाराष्ट्र राज्य, प्रा . दिगंबर दुर्गाडे सर अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे यांच्य शुभ हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर समाज भूषण पुरस्काराने प्रा. कैलाश महानोर यांना गौरवण्यात आले त्यानी शैक्षणीक, सामाजिक, क्रीडा, क्षेत्रात उललेखनीय कामगिरी बद्दल पुरस्कार देण्यात आला यापूर्वी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचा गुणगौरव पुरस्कार , कराटे क्षेत्रात ग्रॅण्ड मास्टर पुरस्कार आनेक पुरस्कारानी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Previous articleकासुडी॔ ते कवडीपाट एक्स्प्रेस हायवेवरील साईडपटयावरील माती काढण्याच्या कामात ठेकेदाराकडून हलगर्जीपणा – सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे
Next articleगाडगे महाराजांच्या खराट्याने डोक्यातले वाईट विचार साफ करा : लक्ष्मीकांत खाबिया