कोरेगावमुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सचिन निकाळजे यांची निवड

उरुळी कांचन

कोरेगावमुळ (ता.हवेली) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सचिन निकाळजे यांची निवड झाली. लिलावती बोधे यांनी राजीनामा दिल्याने सदर जागेवर उपसरपंचपदाची निवड सरपंच विठ्ठल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी ग्रामविकास अधिकारी आर एस जगताप, ग्रामपंचायत सदस्य बापुसाहेब बोधे, भानुदास जेधे, दत्तात्रय काकडे, वैशाली सावंत, मनिषा कड, अश्विनी कड, राधिका काकडे, मंगल पवार आदी आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleपिंपरी चिंचवड येथे सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
Next articleकासुडी॔ ते कवडीपाट एक्स्प्रेस हायवेवरील साईडपटयावरील माती काढण्याच्या कामात ठेकेदाराकडून हलगर्जीपणा – सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे