श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील सोनुबाई सखाराम महाजन शेतकी प्रशालेचा निकाल 100 टक्के

मांडवगण – प्रतिनिधी – श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील सोनुबाई सखाराम महाजन शेतकी प्रशालेचा दहावीचा  निकाल 100% लागला . या शाळेचे सर्व स्तरातून  कौतुक होत आहे .

कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या दोन वर्षांपासून शाळा ऑनलाईन /ऑफलाइन अशा संमिश्र पद्धतीने सुरू होत्या. विद्यार्थी शाळेपासून दूर होते. ऑनलाइन शिक्षण जरी सुरू असले तरी प्रत्यक्ष शाळा,शिक्षक यांच्यापासून विद्यार्थी दुरावले गेले होते.अशा परिस्थिती मांडवगण  विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एस.एस.सी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल 100 % इतका लागला.

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मांडवगण  विद्यालयाने चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली. दहावीच्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले.विद्यालयात पहिले तीन आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे.

१ .)कु.साहिल किशोर आंधळे  – ८९ .६0 %२.)कु .वैष्णवी हरीदास लोखंडे  ८४ .४0  % ३.)कु. प्रियंका केशव गोसावी  ८४ .00 % 3 .)कु.दीप गोरख भूतकर ८४ .00 % 3.) संकेत दत्तात्रय चौधरी ८४ .00 %सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे व त्यांना मागदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन ग्रामस्थांकडुन करण्यात आले.

ह्या मुलांना मुख्याध्यापक श्री रसाळ सर शिक्षक– श्री दळवी सर ; श्री गायकवाड सर; श्री गुंजाळ सर; श्री मोरे सर; श्री भापकर सर ; श्री काराळे सर;श्री साळवेसर यांनी मार्गदर्शन केले .

Previous articleमराठा महासंघाच्या वतीने कासुर्डी ते लोणी काळभोर टोल नाका महामार्ग दुरुस्तीचे निवेदन
Next articleवीट येथे जागतिक योग दिवस साजरा