वीट येथे जागतिक योग दिवस साजरा

वीट : करमाळा तालुक्यातील वीट गावात श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व सदगुरू कृषी महाविद्यालय कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२२/२३ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

माध्यमिक विद्यालयाचे योगा शिक्षक साहेबराव आरकीले सर, जाधव सर व कृषिदूत दर्शन काकुस्ते, प्रथमेश गाढवे ,मयूर भिंगारदे , पांडुरंग चव्हाण ,सौरभ तोरणे यांनी विद्यार्थ्यांना योगासने करून दाखवली व त्याचे आपल्याला होणारे फायदे सांगितले. मुख्याध्यापक – कोळेकर सर , संस्थेचे सचिव – देविदास ढेरे व राऊत सर , बेर्डे सर , आवटे मॅडम, आजबे सर , काळे सर इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन योगासने केली .या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सौ. कल्याणीताई नेवसे, संस्थापक श्री. शंकर शेठ नेवसे, सचिव श्री. राजेंद्रजी गोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. के. बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा.सी. बी. माने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर कार्यक्रम समन्वय : प्रा. एस. यादव, प्रा. पूजा इनामके, प्रा. आर. बी. कापरे, प्रा. अमोल विधाते, प्रा. हेमंत कपिले यांचे मार्गदर्शन व सहकार्य या कृषिदुतांना लाभले. यावेळी सरपंच सौ. वंदना उदय ढेरे व उपसरपंच सौ. अनुराधा समाधान कांबळे ,ग्रामविकास अधिकारी- एस. एफ.शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleश्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील सोनुबाई सखाराम महाजन शेतकी प्रशालेचा निकाल 100 टक्के
Next articleपिंपरी चिंचवड येथे सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान