गोलांडी येथील जिल्हा परिषद शाळेला जिल्हा रोटरी क्लबच्या माध्यमातून एलसीडी भेट

योगेश राऊत, पाटस

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलांडी (साळुंखे वस्ती पाटस ता.दौंड) या शाळेत पुणे जिल्हा रोटरी क्लबच्या माध्यमातून स्क्रीन भेट देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण घेता यावे म्हणून शाळेसाठी एलसीडी स्क्रीन भेट देण्यात आली.

यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष अनिल शितोळे व ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य स्वप्निल बाळासाहेब भागवत सुनील साळुंखे ज्येष्ठ नेते , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश कुदळे, भागवत वाडी सोसायटीचे मा. चेअरमन धनंजय भागवत, दौंड तालुका प्रहार अपंग क्रांती सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब नानवर, युवा उद्योजक रवींद्र कुदळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय गुंड मॅडम, शिक्षक नितीन झिटे सर , अंगणवाडी शिक्षिका राऊत मॅडम व इतर. शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झिटे सर यांनी केले व मान्यवरांचे आभार महेश कुदळे यांनी मानले.विद्यार्थ्यांना अध्यापनामध्ये शैक्षणिक साधनांची आवश्यकता खूप महत्त्वाची- स्वप्निल भागवत

Previous articleकवठे येमाई येथे योगदिन उत्साहात साजरा
Next articleट्रक व दुचाकीच्या अपघातामध्ये मुलगी ठार तर पिता जखमी