ट्रक व दुचाकीच्या अपघातामध्ये मुलगी ठार तर पिता जखमी

नारायणगाव.- (किरण वाजगे)

एक्टिवा गाडी वर चाललेल्या बाप-लेकीला वारुळवाडी वरून पुणे नाशिक महामार्गाच्या दिशेने निघालेल्या ट्रकने धडक दिल्याने बापलेक गाडीवरून पडून या अपघातामध्ये लेकीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर वडिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवार दि २१ रोजी दु २ च्या सुमारास वारूळवाडी गुंजाळवाडी रोडवर वारूळवाडीच्या ग्रामपंचायतच्या जुन्या इमारती समोर घडली.

तेजश्री बन्सीलाल काळे (वय ३३ वर्ष रा घोडेगाव )असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकचा ड्रायव्हर गोविंद तुकाराम राठोड रा परभणी हा त्याच्या ताब्यातीलमालवाहू ट्रक क्रमांक एम एच १२ एच डी ६१८२ वारूळवाडी वरून पुणे नाशिक महामार्गाच्या दिशेला घेऊन जात असताना जुन्या वारूळवाडी ग्रामपंचायतच्या इमारती समोर होंडा कंपनीच्या ऍक्टिवा मोपेड क्र एम एच ०४ एच जी २१८९ वर चाललेल्या बन्सीलाल व त्यांची मुलगी तेजश्री हिला मागून धडक दिल्याने दोघेही खाली पडले. या अपघातामध्ये तेजश्री च्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तिला नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर बन्सीलाल यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी ट्रक ड्रायव्हर ला ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास हवालदार संतोष कोकणे करत आहेत.

Previous articleगोलांडी येथील जिल्हा परिषद शाळेला जिल्हा रोटरी क्लबच्या माध्यमातून एलसीडी भेट
Next articleगुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिरात योग दिन उत्साहात साजरा