गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिरात योग दिन उत्साहात साजरा

नारायणगाव : किरण वाजगे
नारायणगाव येथील गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिरामध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या श्रीमती नूतन बहेनजी तसेच निवृत्त सेनाधिकारी उमेश अवचट, वैशाली आंद्रे यांनी योग प्रात्यक्षिकासह उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, पर्यवेक्षक रामचंद्र शेगर, सुनंदा खाडे, क्रीडा प्रमुख भीमराव पालवे, अरविंद ब्रह्मे, शितल बहेनजी, सिताराम जाधव, प्रा.रत्नाकर सुबंध, सोमनाथ सुवर्णकार, प्रा. बबनराव वारुळे आदी मान्यवरांसह सुमारे ९०० विद्यार्थी, छात्रसैनिक, पालक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर यांनी योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व विशद केले.

या उपक्रमाचे नियोजन ब्रह्मकुमारी म्युझिकल एक्झरसाइज ग्रूप आणि शिक्षक बबन गुळवे, रोहित भागवत, राहूल नवले, कावजी भवारी, बाबासाहेब वळकुंदे, साहेबराव गाळव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.रत्नाकर सुबंध यांनी केले तर आभार अरविंद ब्रह्मे यांनी मानले.

Previous articleट्रक व दुचाकीच्या अपघातामध्ये मुलगी ठार तर पिता जखमी
Next articleमराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांचा शनिवारी पिंपरी – चिंचवडमध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान होणार