कवठे येमाई येथे योगदिन उत्साहात साजरा

कवठे येमाई ( प्रतिनिधी – धनंजय साळवे )21 जून हा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करतात.योग व ध्यानधारणा ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. प्राचीन काळापासून भारतात ॠषीमुनी यांनी अभ्यासपूर्वक योगासने व ध्यानधारणा याची निर्मिती केली.त्यामुळे भारतीयांचे आयुर्मान हे दीर्घायुषी होते. परंतु बदलत्या जीवनशैलीत आपण योगासने,व्यायाम व सकस आहार विसरत चाललो आहे.बाहेरील अन्नपदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले अन्नपदार्थ खावेत. नियमित योगासने व व्यायाम करावा. कारण सकस आहार,योगासने व व्यायाम ही निरोगी जीवनाची गुरूकिल्ली आहे.

कवठे येमाई येथे दरवर्षी येमाई माता शैक्षणिक सामाजिक क्रीडा संघ यांच्या कडून जागतिक योग दिन साजरा केला जातो. याही वर्षी तो साजरा करण्यात आला.यावेळी क्लब चे सदस्य,न्यू इंग्लिश स्कूल चे विध्यार्थी,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी योगगुरु संपत कांदळकर तसेच लिविंग ऑफ आर्टचे भूपेंद्र चौधरी यांनी योगा बदल मार्गदर्शन तसेच अनेक योगांचे प्रकार करून दाखविले. यावेळी क्लबचे अध्यक्ष नवनाथ सांडभोर,उपाध्यक्ष डॉ संतोष ऊचाळे,आरोग्य सेवक विनायक गोसावी,नामदेव सांडभोर हे उपस्थित होते.

न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीनेही  विध्याऱ्थ्यांसाठी योगाचे विशेष शिबिर आयोजन करण्यात आले होते. गाडेकरसर यांनी मुलांना योगाची माहिती व प्रकार समजून सांगितले. तसेच या प्रसंगी अनेक गुणवंत विध्याऱ्थ्यांचा सत्कार येमाई माता शैक्षणिक सामाजिक क्रीडा संघ यांच्या कडून करण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष नवनाथ सांडभोर,उपाध्यक्ष डॉ संतोष ऊचाळे,आरोग्य सेवक विनायक गोसावी,नामदेव सांडभोर,सोपान वागदरे,संदीप वागदरे,दिपक गोसावी,नीलेश पोकळे,गोपीनाथ रायकर,   मुख्याध्यापक वाव्हळसर,मोमीनसर,घोडेसर,करंजकरसर,रासकरसर,गायकवाडसर,थोरातसर,भांगरे मॅडम,नेहरेमॅडम,ओसावेमॅडम, कड्डे मॅडम व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Previous articleनारायणगाव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
Next articleगोलांडी येथील जिल्हा परिषद शाळेला जिल्हा रोटरी क्लबच्या माध्यमातून एलसीडी भेट