ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम

करमाळा- तालुक्यातील वीट येथे  कृषी महाविद्यालयाच्या वतीने मिरजगाव येथील कृषीदुतांचे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमासाठी स्वागत करण्यात आले मागील दोन वर्षापासून सदर कार्यक्रम कोरोनाजन्य परिस्थितीमुळे ऑनलाइन पद्धतीमुळे राबवण्यात येत होता , परंतु सदरच्या निवळत्या परिस्थितीनुसार यावर्षी ऑफलाईन पद्धतीमुळे राबवण्यात येत आहे. कृषिदूत नव्या उत्साहात हजर झाले.

या प्रसंगी सरपंच सौ. वंदना उदय ढेरे व उपसरपंच सौ. अनुराधा समाधान कांबळे ,ग्रामविकास अधिकारी- एस. एफ.शेख व कृषी सहा्यक अधिकारी- श्री उमाकांत जाधव सर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. डॉ. रामदास बिटे , कार्यक्रम अधिकारी- प्रोफेसर चांगदेव माने सर , कार्यक्रम समन्वय – सागर खिलारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदुत – प्रथमेश गाढवे , मयूर भिंगारदे , पांडुरंग चव्हाण , दर्शन काकुस्ते , सौरभ तोरणे यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विषयी मार्गदर्शन केले.

Previous articleलांडेवाडी पिंगळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रोहीदास पिंगळे यांची बिनविरोध निवड
Next articleयवत मध्ये बनावट एशियन पेंट तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा ; तब्बल ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त