टिळेकरवाडी येथे शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन

उरुळी कांचन

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या मॉडेल व्हिलेज उपक्रमातर्गत विभागीय विस्तार केंद्र, कृषि महाविद्यालय, पुणे व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी येथे शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ज्ञानेश्वर बोठे यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने व विक्री व्यवस्थे चा अभ्यास करून पीक पद्धतीचा अवलंब करावा असे सूचित केले.

या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषि अधिकारी पुणे सत्यवान नऱ्हे, तालुका कृषी अधिकारी मारुती साळे , डॉ. सोमनाथ माने, डॉ. श्रीहरी हसबनीस, डॉ. धर्मेद्र फाळके, डॉ. सुनिल जोगदंड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रक्षेत्र भेटीमधून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला म कृ अ हडपसर जि. के.कडलग, कृ. प.आर. एस.डावखर , मेघराज वाळूजुकर तसेच मा.उपाध्यक्ष य.स.सा. कारखाना राजेंद्र टिळेकर , सुभाष टिळेकर, राजेंद्र टिळेकर, रोहिदास टिळेकर , नंदकुमार टिळेकर, संतोष टिळेकर, मा.सरपंच, बाळासाहेब चौरे, कृषीनिष्ठ शेतकरी गणेश टिळेकर , किसन टिळेकर, संतोष राऊत, कृ स आर एम भोसेकर, अमित साळुंखे , महेश सुरडकर, नागेश मेहत्रे, शंकर चव्हाण, महेश महाडिक ,ज्योती हिरवे , मुक्ता गर्जे उपस्थित होते.

Previous articleउरुळी कांचन पतसंस्थेच्या चेअरमनपदी देविदासशेठ भन्साळी, सचिवपदी अशोक सावंत यांची निवड
Next articleकृषी अधिकारी दयानंद बनसोडे यांचा सेवानिवृत्त निमित्ताने विशेष सन्मान