उरुळी कांचन पतसंस्थेच्या चेअरमनपदी देविदासशेठ भन्साळी, सचिवपदी अशोक सावंत यांची निवड

उरुळी कांचन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी देविदासशेठ भन्साळी तर व्हाईस चेअरमनपदी जयप्रकाश बेदरे , सचिवपदी अशोक सावंत व खजिनदारपदी मिलिंद जगताप यांची निवड झाली. उरुळी कांचन पतसंस्थेची निवडणूक पंचवार्षिकरीता बिनविरोध संपन्न झाली. निवडणूक अधिकारी यु. आर. थिटे यांनी काम पाहिले.

संचालक मंडळ पुढील प्रमाणे सर्वसाधारणपुरुष गटातून आठ जागेकरीता एकनाथ विश्वनाथ चौधरी, जयप्रकाश विष्णुपंत बेदरे, देविदास बक्तावरमल भन्साळी, रामचंद्र बाबुराव मेटे, आबासो पाटीलबुवा कांचन, अशोक आबासो सावंत, शिवाजी लक्ष्मण कांचन, मिलिंद तुळशीराम जगताप. सर्व साधारण महिला राखीव गटातून मिनल राजेश फूलसागर, संगिता अनिल दरेकर तर अनु. जाती / जमाती राखीव गटातून विजय पाडुरंग लोखंडे. इतर मागास राखीव गटातून लक्ष्मण (आबा) कृष्णा टिळेकर व विजा / भज / विमाप्र राखीव सुभाष बाबुराव सावंत यांची बिनविरोध संचालक म्हणून निवड झाली.

सभासद, ठेवीदार, ग्राहकांना धावपळीच्या युगात चांगल्याप्रकारे सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचे मत संस्थेचे संस्थापक विद्यमान नुतन चेअरमन देविदासशेठ भन्साळी यांनी सांगितले.

Previous articleसंत यादवबाबा सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाष कांचन , उपाध्यक्षपदी नामदेव महाडिक यांची निवड
Next articleटिळेकरवाडी येथे शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन