संत यादवबाबा सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाष कांचन , उपाध्यक्षपदी नामदेव महाडिक यांची निवड

उरुळी कांचन

शिंदवणे (ता. हवेली) येथील संत यादवबाबा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पुणे उपनिबंधक कार्यालयात पार पडली. यावेळी अध्यक्षपदी सुभाष ज्ञानोबा कांचन व उपाध्यक्षपदी नामदेव वसंतराव महाडिक यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आर. यु. थिटे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत संस्थेचे अध्यक्ष सुभाष कांचन यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या आहेत.

यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक दिलीप गाडेकर, मिलिंद जगताप, अभिजित कांचन, स्नेहलता कांचन, नंदिनी भोर, मनोज कांचन, रमेश कांचन उपस्थित होते.

Previous articleउरूळी कांचन येथील अंकुर इंग्लिश मिडियम स्कुलच्या मुलांचा प्रवेश उत्साहात
Next articleउरुळी कांचन पतसंस्थेच्या चेअरमनपदी देविदासशेठ भन्साळी, सचिवपदी अशोक सावंत यांची निवड