दौंड तालुक्यातील केडगाव बोरीपार्धी याठिकाणी वायदेबाजार (ठोक विक्री) सुरू करण्याची मागणी

कुरकुंभ,सुरेश बागल

कृषी उत्पन्न बाजार समिती,मार्केट यार्ड-पुणे यांना दौंड तालुक्यातील केडगाव,बोरीपार्धी-चौफुला परिसरामध्ये वायदे बाजार (ठोक विक्री) सुरू करण्यासंदर्भात ग्राहक कल्याण फाउंडेशन,दौंड तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.

केडगाव- बोरीपार्धी – चौफुला हा परिसर पंचक्रोशी मध्ये पंधरा ते वीस या गावांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. या परिसरामध्ये अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे असून या गावांमधून रेल्वेमार्ग व महामार्ग गेल्यामुळे इथे अनेक प्रकारच्या उद्योगधंद्यांची दालने प्रस्थापित झालेली आहेत. असे असूनही शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये पिकवलेला शेतमाल विकण्यासाठी हडपसर -पुणे -मुंबई यांसारख्या बाजारपेठेमध्ये जावे लागत आहे.

त्या अनुषंगाने तालुक्यातील केडगाव बोरिपार्धी याठिकाणी शेतकरी वायदे बाजार ( ठोक विक्री )सुरू केली तर शेतकऱ्यांचा फायदा होऊन मार्केट कमिटी व ग्रामपंचायतच्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे . तसेच आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे . तरी आपण तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या मागणीचा विचार करून केडगाव – बोरीपार्धी परिसरामध्ये शेतकरी वायदे बाजार ( ठोक विक्री) सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अशी मागणी मा.अध्यक्ष/प्रशासक,कृषी उत्पन्न बाजार समिती,मार्केट यार्ड-पुणे यांना दौंड तालुक्यातील केडगाव, बोरीपार्धी-चौफुला परिसरामध्ये वायदे बाजार (ठोक विक्री) सुरू करण्यासंदर्भात ग्राहक कल्याण फाउंडेशन,दौंड तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये मा. श्री. ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बापूराव नेवसे, दौंड तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशन अध्यक्ष श्री. दिगंबर भागुजी नेवसे, उपाध्यक्ष श्री. अमोल बाळासाहेब दिवेकर, प्रसिद्धी प्रमुख श्री प्रशांत नारायण शिरसागर, कुरकुंभ ग्राहक कल्याण फाउंडेशन उपाध्यक्ष सौ. सविता विजय सोनवणे आणि बोरीपार्धी ग्राहक कल्याण फाउंडेशन अध्यक्ष राहुल मोहन पवार यांनी सह्या केलेल्या आहेत.

Previous articleभीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दशरथ यादव : राज्यस्तरीय पहिले संमेलन 17 व 18 जून रोजी चौफुुला येेेेथे होणार
Next articleउरूळी कांचन येथील अंकुर इंग्लिश मिडियम स्कुलच्या मुलांचा प्रवेश उत्साहात