उरूळी कांचन येथील अंकुर इंग्लिश मिडियम स्कुलच्या मुलांचा प्रवेश उत्साहात

उरुळी कांचन

कलागोविंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अंकुर इंग्लिश मिडियम स्कुल शालेय मुलांच्या प्रथम स्वागत दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख मान्यवर उरुळी कांचन ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र कांचन, कोरेगावमुळचे विठ्ठल शितोळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष बगाडे, भवरापूर च्या उपसरपंच वनिता साठे, संस्थापक अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन कड, मुख्याध्यापिका तनुजा आडेगावकर, सल्लागार कमिटीचे अध्यक्ष बाळकृष्ण काकडे सर, युवा कार्यकतेॕ संजय कांचन,आदी मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये शालेय प्रथम दिवसाचे उद्घाटन झाले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर यानी केले. प्रमुख मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. यामध्ये विठ्ठल शितोळे, राजेंद्र कांचन, सुभाष बगाडे, मोमीन मॕडम, वनिता साठे यांनी शालेय संस्थेला मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सदर प्रसंगी ग्रामस्थ, महिला पालक वर्ग व प्रवेश घेतलेले विद्याथीॕ मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन बाळकृष्ण काकडे सर यांनी केले. तर आभार प्रियंका पवार मॕडम यांनी मानले.

Previous articleदौंड तालुक्यातील केडगाव बोरीपार्धी याठिकाणी वायदेबाजार (ठोक विक्री) सुरू करण्याची मागणी
Next articleसंत यादवबाबा सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाष कांचन , उपाध्यक्षपदी नामदेव महाडिक यांची निवड