कवठे येमाई येथील येस क्लब कडुन विविध प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार

  1. कवठे येमाई (प्रतिनिधी – धनंजय साळवे) आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर चांगले यश मिळवुन गावचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल अनेक मान्यवरांचा येस क्लब तर्फे गौरव करण्यात आला .येस क्लब तर्फे नेहमी शैक्षणिक,सामाजिक, धार्मिक, क्रिडा,शासकीय,राजकीय सेवेत विशेष काम करणार्या लोकांना प्रोत्साहन भेटावे व इतरांनीही त्यांच्यापासुन प्रेरणा घ्यावी हा उद्देश डोळयासमोर ठेऊन ह्या सत्कारांचे नियोजन केले जाते.

  2. यावेळी मोहन पडवळ यांचा चित्रपट लेखनाबद्दल, विक्रीकर अधिकारी सुभाष ईचके यांची बढती झाल्याबद्दल,तृषा गोसावी हिचा बारावी शास्र शाखेत गुरुदत्त महाविद्यालयात सविंदणे येथे प्रथम क्रमांक आल्याबद्दल, दत्ता मुलमुले यांनी एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या पुर्ण केल्याबद्दल, सलोनी शहा यांनी बीएचएमएस पदवी यशस्वीरित्या पुर्ण केल्याबद्दल,संदीपभाऊ वागदरे यांची निमगाव दुडे उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल स्मृतिचिन्ह शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला.

  3. या प्रसंगी नामदेव सांडभोर,रितेश शहा,विनायक गोसावी,संतोष मुखेकर,बाबु खाडे ,निलेश पोकळे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.सुभाष ईचके व मोहन पडवळ यांनी आपल्या जीवनातील संघर्ष व यशस्वी होण्याचा मुलमंत्र सांगितला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य संजय चौधरी यांनी केले.स्वागत भुपेंद्र चौधरी यांनी तर आभार अध्यक्ष नवनाथ सांडभोर यांनी मानले.

Previous articleलोणी भापकर मध्ये सचिन पवार यांच्या संकल्पनेतून ग्राम स्वच्छता अभियान
Next articleभीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दशरथ यादव : राज्यस्तरीय पहिले संमेलन 17 व 18 जून रोजी चौफुुला येेेेथे होणार