लोणी भापकर मध्ये सचिन पवार यांच्या संकल्पनेतून ग्राम स्वच्छता अभियान

उरुळी कांचन

लोणी भापकर येथील ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपने पंचक्रोशीतील परिसर दर रविवारी (दोन तास) स्वच्छ करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता त्या माध्यमातून त्यांनी लोणी भापकरसह मासाळवाडी, पवळी तसेच पळशी याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवित एक आदर्श काम हे युवक करीत आहेत. लोणी भापकर येथील भैरवनाथ मंदीर, दत्त मंदीर, गावच्या पेठेतील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते, वीज महामंडळ कार्यालय, हायस्कूल व प्राथमिक शाळा सोबतच मासाळवाडी येथील नायकोबा मंदीर व पळशी येथील हनुमान मंदिर, प्राथमिक शाळा याठिकाणी आजपर्यंत स्वच्छता अभियान ग्रुपने राबविले आहे.

या ग्रुपमध्ये शिक्षक, पोलीस, आर्मी, शेतकरी, कामगार, खाजगी व सरकारी नोकरदार, महावितरण कर्मचारी, महसूल विभाग, इंजिनियर, व्यावसायिक असे जवळपास 30 जण काम करीत आहेत. ही संकल्पना लोणी भापकरचे रहिवासी व सध्या भिगवण पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस नाईक सचिन पवार यांना सुचली.

त्यांनी हा प्रस्ताव सर्वांसमोर मांडला असता सामाजिक उत्तरदायित्त्वाचे भान ठेवून सर्वांनी याला लोणी भापकर गाव व आजुबाजूच्या परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यास सहमती दर्शवली. गावातील सर्व समविचारी तरुणांनी एकत्र येऊन रविवार दि. २ जानेवारी २०२२ रोजी सर्वानुमते या ग्रुपची स्थापना करून प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात आली.

आपणही गावाचे काही देणे लागतो या भावनेतून आतापर्यंत 23 रविवारी हे काम ग्रुपमधील सर्वजन मन लावून व एकजिवाने करीत आहेत.

विजयकुमार गोलांडे, विजय पाटोळे, प्रकाश भापकर, सचिन पवार, सचिन भापकर, सचिन कांबळे, रवींद्र आत्माराम भापकर, अविनाश गायकवाड, राजेंद्र खलाटे, विजय भापकर, जयदीप भापकर, दिपक गायकवाड, सचिन संभाजी भापकर, ऋषिकेश भापकर, संदीप भापकर, गणेश भापकर, शरद भापकर, राजू मदने, संदीप गावडे, गणेश भापकर, अभिजित भापकर, शेखर भोसले, योगेश भापकर, विजय यादव, संकेत भापकर, नंदकुमार मदने, अमोल मदने, मनोज वाघ, काका भापकर, हरिश्चंद्र दिक्षीत इत्यादिंचा यामध्ये समावेश आहे.
यापुढील काळात गावातील लोकांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून गावातील शाळा, मंदीरे, बाजारतळ, मुख्य चौक अशा सार्वजनिक ठिकाणी सिमेंटच्या कचरा कुंड्या ठेवायच्या या ग्रुपचे नियोजन आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी जूनपासून पावसाळा सुरू होताच गावात विविध ठिकाणी वृक्षलागवड करून त्याचे जबाबदारीने संवर्धन व संरक्षण करण्याचा संकल्प या ग्रुपने केला आहे.

Previous articleसानिका कोरडे वाणिज्य शाखेत प्रथम
Next articleकवठे येमाई येथील येस क्लब कडुन विविध प्रतिथयश मान्यवरांचा सत्कार