कोरोनाच्या जागतीक महामारीमुळे पूर्व हवेली मध्ये स्वातंत्र्यदिन साध्या पद्धतीने साजरा

अमोल भोसले, उरुळी कांचन – प्रतिनिधी

भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी मोठया उत्साहात संपन्न केला जातो. पण यावेळी कोरोनाच्या जागतीक महामारीमुळे हा ७४ वा भारतीय स्वातंत्र्य दिन एकदम साध्या पध्दतीने साजरा केला गेला.

उरुळी कांचन ग्रामपंचायतचा झेंडावंदन उपसरपंच भाऊसाहेब कांचन यांच्या हस्ते पार पडला तसेच सरपंच राजश्री वनारसे ,ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य – कर्मचारी उपस्थित होते. उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये झेंडावंदन जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुजिता कदम ,सह बी.आर.जाधव इतर आरोग्य कर्मचारीही उपस्थित होते. उरुळी कांचन पोलीस ठाण्या मध्ये येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाला. कोरेगावमुळ ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच लता आनंदा चौधरी यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आला .

यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमास उपसरपंच विठ्ठल थोरात, ग्रा. प. सदस्य लोकेश कानकाटे, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस पाटील वर्षा कड व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते. तसेच जि.प.शाळा गावठाण येथील ध्वजारोहण लोकेश कानकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. जि.प..शाळा बोधे काकडे वस्ती या ठिकाणी माजी सरपंच कविता काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.. या ध्वजारोहणच्या कार्यक्रमाला कोरेगांवमुळ गावचे ग्रामस्थ, सर्व शिक्षक वर्ग व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिंदवणे ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहण सरपंच आण्णासाहेब महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच गणेश महाडिक सह ग्रामविकास अधिकारी – ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सोरतापवाडी ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहण सरपंच सुदर्शन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. उपसरपंच भाऊसाहेब चौधरी, सदस्य राजेंद्र चौधरी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. उरुळी कांचन येथील सरस्वती प्राथमिक शाळेत जेष्ठ समाजसेवक व शाळेचे उपाध्यक्ष डॉ रविंद्र भोळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला. ह्या प्रसंगी मुख्याध्यापक संजय कुंजीर, व शिक्षक -शिक्षिका उपस्थीत होते. सर्व ठिकाणी सोशल डिस्टनशिंग ठेवून एकदम साध्या पद्धतीने मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष  – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
Next articleकार्तिकी पठारे या चिमुकलीने डिजिटल पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करून ठेवला वेगळा आदर्श