छत्रपती शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष  – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

नारायणगाव (किरण वाजगे)

छत्रपती शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष होते त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी किल्ले शिवनेरी गडावर आज व्यक्त केले.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवार दि.१६ ऑगस्ट रोजी शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरी ची पाहणी केली

किल्ले शिवनेरी वरील आई शिवाई मंदिर याठिकाणी राज्यपाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी  आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपवनसंरक्षक जयरामे गौडा, पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. राजेंद्र यादव उपस्थित होते.

किल्ले शिवनेरी परिसराची संपूर्ण माहिती देण्यासाठी शिवाजी ट्रेल चे विनायक खोत यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. गेल्या दोन दशकांत प्रथमच राज्याचे राज्यपाल किल्ले शिवनेरीच्या भेटीला आल्याने शिवप्रेमींनी देखील आनंद व्यक्त केला.

आई शिवाई देवीची आरती केल्यानंतर राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी यांच्या पुतळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी हे स्वराज्य निर्माते आणि राज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक झाले.

सकाळी साडेदहा वाजल्यापासून किल्ले शिवनेरीवरील पहिल्या दरवाजापासून ते संपुर्ण गडावर पायी फिरून राज्यपालांनी गडाची पाहणी केली.

राज्यपालांच्या किल्ले शिवनेरीवरील भेटीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियोजनाची तयारी करण्यात आली होती. पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा देखील सज्ज होती.

पावसाचे वातावरण असल्याने गडावरील राज्यपालांच्या भेटीच्या दृष्टीने विशेष खबरदारी प्रशासनाने घेतली होती.गेल्या २० वर्षांत राज्यपालांच्या किल्ले शिवनेरी भेटीची ही पहीलीच वेळ असल्याने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

Previous articleवळणवाट फाऊंडेशनच्या वतीने शिवे गावात कातकरी समाजाला आरोग्य किट वाटप
Next articleकोरोनाच्या जागतीक महामारीमुळे पूर्व हवेली मध्ये स्वातंत्र्यदिन साध्या पद्धतीने साजरा