स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीमध्ये सातत्य हा यशाचा मूलमंत्र – राहुल भागवत पोलिस उपनिरिक्षक

योगेश राऊत ,पाटस

राहुल बाळासाहेब भागवत यांचा विघ्नहर्ता करिअर अकॅडमी च्या काळे सर यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षा तसेच इतर पोलीस भरती, मिलिट्री भरती यांचा अभ्यास करत असताना त्यामध्ये यशापर्यंत सातत्य असणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना इतरही शैक्षणिक पदवीचे व पदव्युत्तर शिक्षण चालू ठेवले पाहिजे. ते करीत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा अशी प्रतिक्रिया पोलीस उपनिरीक्षक राहूल भागवत यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली.

पाटस विघ्नहर्ता करिअर अकॅडमी च्या वतीने त्यांचा सन्मान आयोजित केला होता विघ्नहर्ता करिअर ॲकॅडमी चे चेअरमन शंकर काळे सर यांनी राहूल भागवत यांनी बारा वर्ष पुणे ग्रामीण पोलीस दलात नोकरी करत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बरोबर करत राहिले अपूर्ण शिक्षण पूर्ण करून इतिहास विषयातील SET, व दोन वेळा NET परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत व पोलीस क्षेत्राबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील आपला ठसा त्यांनी उमटवलेला आहे व ते सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये इतिहास विषयातील विमुक्त जातींवर पी.एच.डी चा अभ्यास करत आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पाटस ग्रामपंचायत सदस्य श्री सप्नील भागवत, शंकर काळे या कार्यक्रमास उपस्थित होते तसेच विघ्नहर्ता करिअर ॲकॅडमी ची सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Previous articleमहिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून धूम ठोकणारा सराईत चोरटा जेरबंद
Next articleनारायणगाव पोलिसांनी लागोपाठ झालेल्या दोन खूनांचा आठ दिवसात लावला छडा