महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून धूम ठोकणारा सराईत चोरटा जेरबंद

उरुळी कांचन

हळदी कुंकवाचा कार्यक्रमा करिता पायी जात असताना मोटार सायकल वरून येणाऱ्या अज्ञात २ इसमानी १२ तोळे वजनाचे सुमारे ५ लाख ४० हजार रु किंमतीचे मंगळ सूत्र जबरदस्तीने ओढून चोरी करून नेले होते. हि घटना शेळकेवाडी ,घोटावडे या.मुळशी येथे घडली होती

या गुन्ह्याचा तपास करीत असताना. गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा पेरणे फाटा येथील रेकॉर्ड वरील आरोपी अरमान नानावत याने केला आहे. त्यानुसार पेरणे फाटा येथे सापळा रचून अरमान प्रल्हाद नानावत वय २२ वर्षे रा पेरणे फाटा जि पुणे यास ताब्यात घेतले , असता त्याचेकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने त्याचे मित्रा बरोबर केला असल्याचे सांगीतले.

आरोपी कडे गुन्हयात वापरलेली मोटारसायकल मिळून आली असून, आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पुढील तपास कामी पौड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिला आहे. सदर आरोपी याचेवर या अगोदर लोणी कंद , वाकड , चंदन नगर पोलिस स्टेशन येथे जबरी चोरी चे गुन्हे दाखल आहेत.

सदरील आरोपी कडून आणखीन गुंन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख , अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे ,पोलिस उपधिक्षक भाऊसाहेब ढोले पाटिल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस उपनिरीक्षक अमित सिदपाटिल, पो हवा विजय कांचन, पो हवा राजू मोमीन, पो ना अमोल शेडगे, पो ना बाळासाहेब खडके, पो कॉ धिरज जाधव, पो कॉ दगडू विरकर,
म पो कॉ पुनम गुंड यांनी केली आहे.

Previous articleअल्प दरात रुग्णांना सेवा देणारे डॉ.रवींद्र भोळे यांना भारतरत्न डॉ ए पी जे कलाम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
Next articleस्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीमध्ये सातत्य हा यशाचा मूलमंत्र – राहुल भागवत पोलिस उपनिरिक्षक