दौंड शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीची बैठक बोरमलनाथ मंदिरात संपन्न

कुरकुंभ : सुरेश बागल

दौंड शहर व तालुका कॉंग्रेस कमिटी ची मासीक बैठक (दि.१६) रोजी दुपारी तीन वाजता बोरंमलनाथ मंदिर,चौफुला येथे पार पडली.

या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिति व नगरपालिका निवडणूकी संदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी व पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी ह्यांच्या मार्गदर्शना नूसार स्वतंत्र पणे निवडणूक लढण्या सबंधी चर्चा करण्यात आली.
प्रत्येक वेळी मिटिंगला गैरहजर राहणारे व पक्षा संदर्भात चुकीची भूमिका मांडणार्यांन वर कार्यवाही संदर्भात ठराव करून अशाना पक्षातून हाकलण्यात यावे ह्या बाबत ‌सर्व सहमतिने ठराव करण्यात आल.

 बैठकीला तालुका अध्यक्ष विठ्ठल खराडे, शहराध्यक्ष हरेष ओझा, युवक तालुका अध्यक्ष श्रेयस मुनोत,वाहतुक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मोहसिन तांबोली, अरविंद दोरगे, अतुल थोरात, रज्जाक भाई शेख,अजय डेंगळे,दळवी , अतुल जगदाळे, तन्मय पवार, विठ्ठल शिपलकर तसेच शहर व तालुका कॉंग्रेस चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleनारायणगावात आज पुन्हा चोरी : एक लाख ६५ हजार रुपये रोख रक्कम व चार ग्रॅम सोने लंपास
Next articleदुर्देवी – चासकमान धरणात चार अल्पवयीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू