नारायणगावात आज पुन्हा चोरी : एक लाख ६५ हजार रुपये रोख रक्कम व चार ग्रॅम सोने लंपास

किरण वाजगे , नारायणगाव

येथील खोडद रोड जवळील डॉक्टर घोरपडे होमिओपॅथी हॉस्पिटलच्यावर श्रीनिवास कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये राहणाऱ्या विजय बाबुराव गुंदेचा यांच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बंद सदनिकेच्या दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तोडून अज्ञात इसमांनी एक लाख ६५ हजार रुपये रोख रक्कम व चार ग्रॅम वजनाचे सोने लंपास केले आहे.

ही घटना बुधवार ( दि.१८ ) रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेचा पंचनामा नारायणगाव पोलिसांनी केला आहे. या घटनेची माहिती अमोल विजय गुंदेचा यांनी पत्रकारांना दिली. या घटनेचा पुढील तपास नारायणगाव पोलिस करत आहे.

दरम्यान काल ( दि. १७ ) रोजी कोल्हेमळा येथील संतोष भुजबळ व राजेश कोल्हे यांच्या दोन बंद सदनिकेमध्ये सुद्धा अज्ञात चोरट्याने कडून चोरी करण्यात आली आहे. तसेच काही दिवसापूर्वी देखील साकार नगरी जवळील आनंद सोसायटी येथे देखील बंद सदनिका फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

Previous articleखाजगी करणा विरोधात रस्त्यावर उतरण्याचा अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचा इशारा
Next articleदौंड शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीची बैठक बोरमलनाथ मंदिरात संपन्न