प्रा. कैलास महानोर राज्यस्तरीय आदर्श ग्रँड मास्टर पुरस्काराने सन्मानित

योगेश राऊत , पाटस

सीफसीसी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन व रणरागिणी महिला विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन अरविंद साळवे, जितेंद्र यादव, उज्वलाताई गौड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा क्रमांक १९ रस्ता पेठ पुणे ११ या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. या कार्यक्रमांमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार यावर्षी प्रा. कैलास महानोर यांना राज्यस्तरीय कराटे आदर्श ग्रँड मास्टर पुरस्कार सिनेअभिनेत्री उज्वलाताई गौड ,जितेंद्र यादव, अरविंद साळवी,राजू दणवे यांच्या हस्ते प्रा. कैलास महानोर यांना देण्यात आला कैलास.

प्रा. कैलास महानोर यांनी गेली पंचवीस वर्ष कराटे क्षेत्रात मार्शल आर्ट मधून समाज प्रबोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रम व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दलप्रा कैलास महानोर यांना पुरस्कार देण्यात आला. प्रा कैलास महानोर हे दौंड पाटस येथे सुभाष अण्णा कुल शिक्षणशास्त्र महाविद्यालय स्पोर्टस डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे. त्यांनी २५०० मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण दिलेले आहे. प्रा कैलास महानोर यांच्या नावावर अनेक विक्रम व पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.सुभाष आण्णा कुल शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ नीलिमा तिखे यांनी प्रा. कैलास महानोर यांचे अभिनंदन केले.

Previous articleनारायणागवात दोन गटांमधील भांडणात १४ जणांवर गुन्हा दाखल; पिस्तूल व चाकूसारख्या प्राणघातक शस्त्रांचा वापर करून गोळीबार
Next articleबकोरी येथील दत्तकृपा विविध विकास कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणूकीत ‘दत्तकृपा सहकारी पॅनेल’चे वर्चस्व