Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

गणेश सातव , वाघोली
हवेली तालुक्यातील बकोरी येथील दत्तकृपा विविध विकास कार्यकारी सहकारी संस्थेची ११ जागेसाठी निवडणूक नुकतीच पार पडली.त्यामध्ये चंद्रकांत वारघडे यांच्या दत्तकृपा सहकारी पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
दत्तकृपा सहकारी पॅनेलच्या उमेदवारांना पडलेली मते खालील प्रमाणे.
सर्वसाधारण मतदार संघ
दत्तकृपा सहकारी पॅनेलचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे
चंद्रकांत गोविंद वारघडे (१२३) प्रकाश दादाभाऊ कुटे(१२४) रमेश काळुराम कुटे (१२४)काळुराम बबन वारघडे (१२३) सोपान कांतीलाल वारघडे (११८) दत्तात्रय गुलाब वारघडे (११९) विलास नामदेव जाधव (११४) पांडुरंग जयवंत वारघडे (११९) सौ विमल सुखदेव वारघडे (१२२)शारदा तुळशीराम वारघडे (११७) भटक्या जाती,जमाती विमुक्त मागास प्रवर्ग मतदार संघ-
किसन चंदर टुले (१२१)
इतर मागासवर्ग प्रवर्ग बिनविरोध उमेदवार बेबी शांताराम कोलते अनुसूचित जाती जमाती मतदार संघाचे बिनविरोध उमेदवार बापू लक्ष्मण कांबळे.
चुरशीच्या झालेल्या लढतींमध्ये खुप मोठ्या फरकाने दत्तकृपा सहकारी पॅनेलचे उमेदवार निवडून आले.निवडणूक शांततेत पार पडावी व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लोणीकंद पोलीस ठाण्याच्यावतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Download WordPress Themes Nulled and plugins.