ऐतिहासिक बारवेवरचे अतिक्रमण हटविण्याची मागणी

संगमनेर- तालुक्यातील समनापुर गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील पुरातन हेमाडपंथी स्थापत्यकलेचा नमुना असलेली ऐतिहासिक बारव गावातील एका कुटुंबाने स्वताच्या व्यावसायिक हिताच्या दृष्टीने बारवेवर अतिक्रमण केले आहे, समनापुरकरांनी आजपर्यंत खूप सहनशीलता, संयम बाळगला आहे, शासन दरबारी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी पत्रव्यवहार केला आहे, ग्रामसभेत या विषयावर युवकांनी प्रखरपणे ठराव मांडला व बहुमताने मंजूर झाला होता. मग या अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यास प्रशासन का पाठीशी घालत आहे? का आणखी कुणी पाठराखण करत आहे? असे अनेक प्रश्न समनापुरकरांना उद्भवत आहेत.

या कामासाठी प्रखर विरोध करत गावातील अनेक तरुण पुढे सरसावले आहेत .आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी गावातील देवा शेरमाळे या तरुणांच्या पुढाकाराने गाव एकत्र झाले आहे..या प्रश्नावर लवकर तोडगा न निघाल्यास रास्ता रोको करण्यात येईल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

Previous articleशिरोली बुद्रुक येथे तब्बल २४ वर्षानंतर उस्फूर्तपणे भरला स्नेह मेळावा
Next articleनारायणागवात दोन गटांमधील भांडणात १४ जणांवर गुन्हा दाखल; पिस्तूल व चाकूसारख्या प्राणघातक शस्त्रांचा वापर करून गोळीबार