शिरोली बुद्रुक येथे तब्बल २४ वर्षानंतर उस्फूर्तपणे भरला स्नेह मेळावा

नारायणगाव ,किरण वाजगे

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे ८ मे रोजी स्नेह मेळाव्याचे उत्स्फूर्तपणे आयोजन करण्यात आले होते. सन १९९७-९८ मधील दहीवीच्या माजी विद्यार्थ्यांनी हा स्नेह मेळावा आयोजीत केला होता.हा स्नेह मेळावा अतिशय यशस्वीपणे पार पाडला. तब्बल चोविस वर्षानंतर सर्वजण एकञ आल्यामुळे सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता.

“मैञी शाळेतील बाकांवरची …आठवणींच्या नात्याची….!” या स्नेह-मेळाव्यासाठी माजी शिक्षक (गुरुजनवर्ग) मोठ्या संख्येने उपस्थित होता. स्नेहमेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून माजी मुख्याध्यापक आदरणीय बारवे सर होते. त्याचबरोबर आदरणीय गोडसे सर , पोखरकर सर, ढोले सर , साबणकर सर, येंधे सर, ए.ए. डुंबरे सर , कांबळे सर , अय्यर सर, दांगट सर , थोरवे सर, कुलकर्णी सर , महेंद्र बोर्‍हाडे सर उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी युसुफ चाचा, कैलास मामा व शांताराम मामा उपस्थित होते. या कार्यक्रमाला आर. एम. डुंबरे सर व गायकवाड मॅडम वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकले नाही. मात्र त्यांनी दिलगिरी व्यक्त करत शुभेच्छा संदेश पाठविला. कार्यक्रमाची सुरुवात फेटे बांधून व गुलाब पुष्प देऊन तसेच स्वागत जल देऊन करण्यात आली. त्यानंतर सर्व गुरुजन वर्गाने मिळून दीपप्रज्वलन केले.

सर्व उपस्थितांसाठी स्वागतगीत व समूहगीत माजी विद्यार्थीनी स्वाती अर्जुन थोरवे , निलम विधाटे , किर्ती बोर्‍हाडे, मोहीनी शेरकर , योगिता ढोमसे , स्वाती थोरवे , अर्चना बोर्‍हाडे , निलम भिलारे यांनी सादर केले. यावेळी माजी विद्यार्थी व शिक्षक हयात नाहीत त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सर्व गुरुजन वर्गाचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ, गुलाबपुष्प व श्रीमानयोगी ही कांदबरी देऊन करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने आपला परिचय करून दिला.
यावेळी सर्व गुरुजनांनी आपले प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेला भेट म्हणून साउंड सिस्टिम व स्पिकर सेट देण्यात आला.

शेवटी अध्यक्षीय भाषण झाले त्यामध्ये अध्यक्षांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले. आपल्या आईवडिलांना प्रथम स्थान द्या त्यांना कधीही विसरु नका , त्याचबरोबर आपण आपली प्रगती करत असताना संधी निर्माण करावी लागते आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहीजे. आपण ज्या प्रकारची पुस्तके वाचतो तसेच आपले विचार असतात व ते विचार कृतीच्या माध्यमातून निदर्शनास येतात. अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये अध्यक्ष बारवे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांची मार्गदर्शनपर कानऊघडणी देखील केली. या कार्यक्रमाचे सूञसंचालन योगिता ढोमसे यांनी केले. तसेच या कार्यक्रमातील ऊल्लेखनिय बाबी म्हणजे मंडप व्यवस्था , फॅनची व्यवस्था , फेटे बांधण्याची व्यवस्था, जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अतुल जाधव , मंगेश थोरवे , शैलेश शिंदे, ज्ञानेश्वर सरोदे , दयानंद नायकोडी, किरण डोके, मंगेश मांडे, गणेश थोरवे, संदिप वाकचौरे , अजित मोरे , अभिजीत मोरे , राजू बन्सी , सुनिल विधाटे , निलेश नवले , स्वाती अर्जुन थोरवे , निलम विधाटे , योगिता ढोमसे , मोहिनी शेरकर व किर्ती बोर्‍हाडे यांनी मोठे परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी झाला. सर्व माजी विद्यार्थी व सर्व गुरुजन यांची एकञीत फोटोफ्रेम सर्वांना देण्यात आली. हा आनंदाचा स्नेहमेळावा अतिशय सुंदर रित्या पार पडला. हा कार्यक्रम सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत उत्स्फूर्तरित्या चालू होता. या कार्यक्रमाचे आभार योगिता ढोमसे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गाऊन करण्यात आली. अतिशय सुंदर रित्या पार पडलेल्या या स्नेहमेळाव्याच्या शेवटी गुरुजनांसह विद्यार्थी देखील भावुक झाले होते. शेवटी जड अंतःकरणाने एकमेकांना निरोप देण्यात आला.

Previous articleनिधन वार्ता – वारूळवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब वारुळे यांचे निधन: संजय व नितीन वारुळे यांना पितृशोक
Next articleऐतिहासिक बारवेवरचे अतिक्रमण हटविण्याची मागणी