दुर्ग रक्षक फोर्सने राबवली रायगडावर प्लास्टिक मोहीम

पुणे- श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकिल्ले म्हणजे शिवरायांचा श्वास आणि ऊर्जा स्रोत. तसेच दुरवर पसरलेल्या सह्यादी पर्वत रांगा ह्या शिव छत्रपतींच्या चरणाची पायधूळ आपल्या मस्तकी मळवट भरून उभ्या राहिल्या आहेत, याची जाणीव होते. स्वराजाची राजधानी किल्ले रायगड आणि गडकिल्ले यांमुळे हिंदवी स्वराजाची श्रीमंती ही द्विगुणीत झाली. छञपती शिवाजी महाराज व धर्मविर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास म्हणजे ईश्वर निर्मित नवीन जिवणाची दिशा आणि हिंदवी स्वराजाची संकल्पना होती आणि आहे. हिंदवी स्वराज्याचा इतिहास म्हणजेच छत्रपतींचा संघर्ष आणि त्यासाठी त्यांनी अविरत केलेला खरा प्रयत्न, राजकारण, लढाई आणि स्वराज्य निर्मिती साठी केलेला रक्ताचा अभिषेक समाजातील सर्व घटकाला माहीत आहे. परंतु सध्याचा युवक वर्ग व समाजातील विविध क्षेत्रातील लोकांनी गड किल्ले हे पर्यटन स्थळे मानली आहेत व किल्ल्यावर धुम्रपान, नशा, कोल्ड्रिंक्स, पाण्यांच्या बाटल्या व प्लास्टिक या सर्व गोष्टींमुळे किल्ल्यावर खूप प्रमाणात कचरा होत आहे.

आपल्याच महाराष्ट्राचे वैभव जपून ठेवण्यासाठीच दि. १ मे २०२२ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दुर्ग रक्षक फोर्स व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगड बेमुदत प्लास्टिक मोहीम सुरू करण्यात आली आहे. किल्ले रायगड बेमुदत प्लास्टिक मोहीमेची संकल्पनेसाठी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व विविध दुर्ग संघटनांकडून दखल घेतली जात आहे. किल्ले रायगड व रायगडचा परिसर स्वच्छ करण्यासाठी दुर्गसंवरधक व सहकारी पायथा ते किल्ल्यावरील संपूर्ण भागातील प्लास्टिक जमा करणार आहेत. दरीमधील पडलेले प्लास्टिक व प्लास्टिक बोटल बाहेर काढण्यासाठी वेगळी ट्रेकर्स टिम तयार करण्यात आली आहे.

बेमुदत प्लास्टिक मोहिमेत दुर्ग रक्षक फोर्स संस्थापक अध्यक्ष जयकांत शिंक्रे, स्वराज्य रक्षक वर्षा चासकर, दुर्ग रक्षक जोसेफ वेरोनिका लखपती, भारतीय पुरातत्व विभाग सहकारी, सिध्दाई ट्रेकर्स, दुर्ग मावळा परिवार, सहयाद्री शिलेदार, शिवराज युवा प्रतिष्ठान, आधार फाउंडेशन परिवार, शिव आज्ञा परिवार, सहयाद्री संजीवनी परिवार, छावा ग्रुप, पेन्स फाउंडेशन संस्था, भारती विद्यापीठ परिवार यशवंतराव मोहिते महाविद्यालयाचे विद्यार्थी व स्टाफ इतर संलग्न दुर्ग संवर्धन संस्था व दुर्ग प्रेमी यांनी सहभाग घेतला आहे.

या मोहीमेचे प्रमुख गडकोट संवर्धक श्री. जयकांत शिक्रे व त्यांचे सहकारी डॉ. अमोल मोहन पाटील, श्री. शिवाजी औकिरकर, यांनी या मोहिमेत रायगड व पायथ्याशी असणारी गावातील २६६ पुरूष व १५५ महिलांचा व विविध बचत गटातील महिलांचा सहभाग तसेच लोकांपर्यंत जनजागृती करून लोकांना या प्लास्टिक मुक्त मोहिमेत सामील करून घेतले आहे.

रायगड स्वच्छता मोहीम आपला अभिमान व स्वाभिमान आणि महाराष्ट्राचे वैभव जपून ठेवण्यासाठीच आहे. रायगडावर येणाऱ्या सर्व शिव-शंभूभक्त हे प्लास्टिक मुक्त मोहिमेत सहभाग घेऊन छत्रपतींना एक वेगळी मानवंदना देतील अशी माहीती डॉ. अमोल मोहन पाटील यांनी विविध माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी विविध क्षेत्रातील सामाजिक संघटना, शिव-शंभू भक्त व गावातील लोक उपस्थित होते.

Previous articleधामणी येथील साकव पुलासाठी १ कोटी रु. निधी मंजूर
Next articleगुल्हर चित्रपट सहा मे ला प्रदर्शित