धामणी येथील साकव पुलासाठी १ कोटी रु. निधी मंजूर

मंचर- महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभाग तसेच महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री दिलीप वळसे यांच्या माध्यमातून धामणी हायस्कुल कडे जाणार साकव पुलासाठी ५० लक्ष रु. तसेच ,खंडोबा मंदिर कडे जाणारा ओढ्यावरील साकव पूल यासाठी ५० लक्ष रु. मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील शिवाजी विद्यालय धामणी कडे जाणाऱ्या पुलाचे काम आज प्रत्यक्षरीत्या सुरू करण्यात आले.

पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी कुदळ मारून तर धामणी लोकनियुक्त सरपंच सागर जाधव पाटील,शिरदाळे उपसरपंच मयुर सरडे,मा.ग्रा.पं. सदस्य आनंदा जाधव पाटील,दिलीप वाघ, पप्पू जाधव यांच्या शुभहस्ते नारळ फोडून या कामाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी धामणी साठी भरगोस निधी दिल्याबद्दल तसेच म्हाळसाकांत पाणी योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकार तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विशेष आभार मानले.

यावेळी कॉन्ट्रॅक्टर गुलाब वाघ,ग्रा.पं. सदस्य आकाश जाधव, सोसायटी संचालक दीपक जाधव,युवा सेना तालुकाध्यक्ष अक्षयराजे विधाटे, रंगनाथ करंजखेले,राहुल करंजखेले,रामदास वीर,बळी बोऱ्हाडे,सतीश पंचरास,बापू वाघ,कुशल जाधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleबिबट सफारी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी मंजूर
Next articleदुर्ग रक्षक फोर्सने राबवली रायगडावर प्लास्टिक मोहीम