गुल्हर चित्रपट सहा मे ला प्रदर्शित

कवठे येमाई _(धनंजय साळवे )कवठे येमाई सारख्या ग्रामिण भागातील लेखक मोहन पडवळ यांचे लेखन असलेला  “गुल्हर ” चित्रपट येत्या सहा तारखेला सर्वत्र प्रदर्शित होतोय.धनगर समाजावर आधारीत असा हा चित्रपट आहे.समाजातील चांगल्या वाईट प्रथावर प्रकाश टाकण्याबरोबर गुढ व मनाला हुरहुर लावणारा,प्राणी मात्रांवर दया करा असा संदेश देणारा असा हा चित्रपट आहे असे लेखक मोहन पडवळ यांनी सांगितले.

या चित्रपटात माधव अभ्यंकर,शिवानी बावसकर,विनायक पोतदार,भार्गवी चिरमुले,रमेश चौधरी,शिवाजी भितोंडे ,सुरेश विश्वकर्मा,चौगुले असे अनेक नावाजलेले कलाकार आहेत .दिग्दर्शन रमेश चौधरी यांचे तर संगित पद्मनाभ गायकवाड यांचे आहे.निर्मिति शांताराम मेदगे,शिवाजी भिंताडे,अनुप शिंदे, अबिद सय्यद यांची आहे.अजय अतुल यांचे सुध्दा आवाजासाठी सहकार्य लाभले आहे.ग्रामिण भागातील तरुणांनी एकत्र येऊन ह्या चित्रटासाठी मेहनत घेतल्याने सर्वांनी हा चित्रपट नक्की पहावा. कथा, पटकथा ,संगित ,दर्जेदार छाया चित्रण,ग्रामिण जिवन दर्शन यामुळे हा चित्रपट नक्की यशस्वी होईल.सहकुटुंब व मित्रपरिवारासोबत पहाण्यासारखा हा चित्रपट आहे.

Previous articleदुर्ग रक्षक फोर्सने राबवली रायगडावर प्लास्टिक मोहीम
Next articleगांजाची तस्करी करणाऱ्या पुण्यातील दोघांना अटक ! पावणे दोन लाखांचा बेकायदा गांजा जप्त