पक्षी मित्रांकडुन उन्हाळ्यात पक्षांसाठी खाद्य व पाण्याची सोय.

कवठे येमाई (धनंजय साळवे) – उन्हाळा चांगलाच वाढु लागल्यामुळे उन्हाच्या झळा जाणवु लागल्या आहेत.माणसांबरोबर प्राणी व पक्षांनाही उन्हाचा त्रास जाणवु लागला आहे. अनेक प्राणी व पक्षीमित्र दरवर्षी यासाठी विविध उपक्रम राबवत असतात.ह्या दिवसात अनेक पाणवठे कोरडे पडलेले असतात.त्यामुळे पक्षी व प्राणी पाण्याच्या शोधात फिरत असतात.पक्षी व प्राणी मित्रांकडुन त्यांच्या अन्न व पाण्याची सोय आप आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करतात.कवठे येमाई येथील येसक्लबचे उपाध्यक्ष डॉ.संतोष उचाळे व त्यांची छोटी मुले चि.आदेश व समु यांनी ही टाकाऊतुन टिकाऊ या संकल्पनेनुसार पक्षांना खाद्य व पाण्यासाठी आपल्या जिवनज्योत हॉस्पिटल्सच्या परीसरात सोय केली आहे.तसेच नगर जिल्हयातील मांडवगण येथील एक उपक्रमशील शिक्षक विजय साळवे यांनीही आपल्या विद्यार्थ्यांच्या समवेत शालेय परीसरात पक्षांच्या खाद्य व पाण्यासाठी डब्यांचा उपयोग करुन वस्तु बनवल्या आहेत.असेच अनेक उपक्रम आपल्याला अनेक ठिकाणी पहायला भेटत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन मोठ्या माणसांच्या मदतीने असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत.आपल्या आसपास साधारणता साळुंकी,पोपट,चिमणी,कावळा,मैना,कोकीळा,सुतारपकक्षी,दयाळ,नाचण,भूकस्तूर,घुबड,शामा,पिंगळा,रातवा,करवानक,शिक्रा,लावा,टिटवी,पारवा,होला,हरोळी,पावशा,चातक,भारद्वाज,नीळकंठ,धीवर,हुदहुद,वेडाराघु,तांबट,चंडोल,परीट,बुलबुल,खाटीक,दयाळ,चीरक,गप्पीदास,सातभाई,वटवट्या,सूर्यपक्षी,मनोली,सुगरण शिंपी,मोर, हे पक्षी आढळतात.कधी कधी असे म्हटले जाते की मानवाशिवाय पक्षी जगु शकतात पण हे पक्षी नसेल तर मानवाला जगणे अवघड होईल.पक्षी कीटक अळ्यांना खातात हेच कीटक उभ्या पिकांचा फज्जा उडवुन अब्जावधी रुपयांचे नुकसान करत असतात.निसर्गाचे सफाई कामगार म्हणुनच हे काम करत असतात.प्रत्येकाने पक्षी जगविण्यासाठी आपल्या अंगणात परीसरात त्याच्यासाठी पाणी व अन्नाची सोय केली पाहीजे.

Previous articleकुंजीरवाडीत फळे व भाजीपाला संकलन केंद्राचे उद्घाटन
Next articleआनंदी व प्रसन्न राहण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज – मानसशास्त्रज्ञ योगिता अडसरे