कुंजीरवाडीत फळे व भाजीपाला संकलन केंद्राचे उद्घाटन

उरुळी कांचन

मौजे कुंजीरवाडी (ता.हवेली) येथे किसान कनेक्ट फळे व भाजीपाला संकलन केंद्राचे उद्घाटन तालुका कृषि अधिकारी हवेली मारुती साळे यांच्या हस्ते करण्यात आले. किसान कनेक्ट संकलन केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी सारंग निर्मळ यांनी किसान कनेक्टची संकल्पना विशद करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या उत्पादित शेत मालाला योग्य बाजारपेठ मिळवून दिली जाईल‌ याची ग्वाही उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी दिली.

तालुका कृषि अधिकारी हवेली मारुती साळे यांनी शेतकऱ्यांना नियंत्रित शेती, शेडनेट, पाॅलीहाउस, मग्ररोहयो अंतर्गत फळबाग लागवड, गांडुळ खत प्रकल्प,नाडेप खत प्रकल्प , ठिबक / तुषार सिंचन योजना, महाडीबीटी पोर्टल वरील कृषि यांत्रिकीकरण योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना बाबत कृषि मित्रांना व क्षेत्रिय कर्मचारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रगतशील शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक आप्पासाहेब काळभोर पुणे यांनी मार्गदर्शन करताना किसान कनेक्ट फळे व भाऊजीपाला संकलन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कृषि पर्यवेक्षक हडपसर-२ रामदास डावखर यांनी मार्गदर्शन करताना किसान कनेक्ट फळे व भाजीपाला संकलन केंद्राचा उपयोग परिसरातील सर्व भाजीपाला व फळे उत्पादक शेतकऱ्यांना होईल व त्यांना योग्य बाजारभाव मिळेल. शेतकऱ्यांनी दर्जेदार भाजीपाला व फळांचे उत्पादन घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कृषी पर्यवेक्षक हडपसर-१ मेघराज वाळुंजकर यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती , फळे व भाजीपाला उत्पादन रासायनिक खते, किटकनाशके, व तणनाशकांचा नियंत्रित व कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार वापर करणे बाबत मार्गदर्शन केले. एकात्मिक पद्धतीने शेती करताना रासायनीक निविष्ठा बरोबरच जैविक, सेंद्रिय निविष्ठांचा अवलंब करून मातीचे आरोग्य अबाधित राहील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे तसेच संकलन केंद्राचे व्यवस्थापक चव्हाण यांनी सर्व प्रमुख पाहुणे, उपस्थित अधिकारी / कर्मचारी, किसान कनेक्टची टिम, व उपस्थित शेतकरी वर्गाचे आभार मानले.

Previous articleमराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Next articleपक्षी मित्रांकडुन उन्हाळ्यात पक्षांसाठी खाद्य व पाण्याची सोय.