कुरकुंभ एमआयडीसीत केमिकल कंपनीत चोरी करणाऱ्या दहख आरोपींना अटक : दौंड पोलिसांची दमदार कामगिरी

कुरकुंभ, सुरेश बागल

कुरकुंभ (ता. दौंड ) एमआयडिसीतील मेलजर कंपनीतील चोरी उघडकीस आणण्यात दौंड पोलीसांना यश आले आहे . कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेल्जर कंपनीमध्ये ( ता. ५ मार्च २०२२ ) रोजी अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ लाख १० हजार ११४ रुपये किमतीचे 56 ड्रम नायट्रो मिथेन केमिकल चोरीला गेलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता .

या गुन्हयाचे अनुशंगाने पोलीस निरिक्षक विनोद घुगे यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देवून तपासाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून यु. पी. , मुंबई , एम. पी. अशा प्रदेशामध्ये पथके पाठवुन या गुन्हयामध्ये एकूण १० आरोपी निष्पन्न करत त्यांना अटक करण्यात आली आहे .

आरोपी १) शंकर दिनकर झरेकर ( रा.नानविज , ता . दौंड जि . पुणे ) , २)बिरप्पा मारुती लवटे ( रा . गोपाळवाडी ता . दौंड जि.पुणे ) , ३)ढब्बू भगेला कहार (रा.उत्तरप्रदेश ) ,४) केशव दत्तु रसाळ ( रा.पाटस , ता .दौंड , जि.पुणे ) , ५)विशाल दशरथ शितोळे ( रा.खड़की , ता . दौंड जि.पुणे ) , ६)सचिन संजय गिरमे ( कुरकुंभ दौंड ,जि. पुणे ) ७)सागर मच्छिंद्र बारवकर ( रा. देवळगावगाडा ता. दौंड,जि. पुणे,) ८)महेश तात्यासाहेब गायकवाड, (रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे,)९) ब्रिजेश रामलवटण यादव (रा. मुंबई, भिवंडी, )१०) संजय टिटलु यादव ( रा. भिवंडी मुंबई, ) या दहा आरोपींना अटक करण्यात आलेली असून या आरोपींकडून १३ लाख ६२ हजार ७२९ रुपयाचे नायट्रो मिथेन केमिकल जप्त करणेत आले आहे .

या आरोपींना दौंड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली .

या गुन्हयाचे तपासामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरिक्षक विनोद घुगे , पोलीस उपनिरिक्षक सतिश राऊत , सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अनिल कोळेकर , पोलीस हवालदार शंकर वाघमारे , पोलिस हवालदार श्रीरंग शिंदे , पांडुरंग थोरात , पोलिस नाईक राकेश फाळके , महेश पवार, पोलिस कॉन्स्टेबल अमोल राऊत यांनी भाग घेतला होता .

Previous articleकोरोनामुक्ती’ची पहाट घेऊन आलेला गुढीपाडवा राज्यात सुख-समृद्धी,आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleचांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर जि. पुणेेे येथे एल.ई.डी.बल्ब उत्पादन कार्यशाळा आयोजित केली गेली