कै.रविंद्र गायकवाड यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गायकवाड कुटूंबीयांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

निगडाळे (ता.आंबेगाव) येथील युवा कार्यकर्ते कै.रविंद्र खंडू गायकवाड यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गायकवाड कुटूंबीयांच्या वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

निगडाळे येथील सम्यक बुद्ध विहारात वडील खंडू गायकवाड,आई ताराबाई गायकवाड व भाऊ सिद्धार्थ गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या,पेन,पेन्सिली,खोडरबर,शॉपनर व शाळेतील बालवाचनालयासाठी पन्नास गोष्टींची पुस्तके भेट देण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.रविंद्र गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी वनसमिती सदस्य जितेंद्र गायकवाड,नामदेव गायकवाड, दिनकर गायकवाड,योगेश गायकवाड,राहुल गायकवाड,प्रितम अंकुश,मुख्याध्यापक संतोष थोरात,शिक्षिका अलका गुंजाळ,विकास रोकडे,निलेश लोहकरे,उमेश लोहकरे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी प्राथमिक शाळेतील वाचनालयाला स्व.रविंद्र खंडू गायकवाड बालवाचनालय असे नाव देण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजन तुषार लोहकरे,संदीप कुऱ्हाडे,संतोष लोहकरे,रंजना अभंग,अंजना गायकवाड,सुषमा लोहकरे यांनी केले.प्रास्ताविक विकास रोकडे,सूत्रसंचालन व आभार जितेंद्र गायकवाड यांनी मानले.

मुलाच्या स्मृतिदिनानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्याचा विधायक उपक्रम राबवत गायकवाड परिवाराने समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला असून त्यांचा उपक्रम स्तुत्य असून समाजाने यातून प्रेरणा घेण्याची गरज आहे.- संतोष रामचंद्र थोरात (मुख्याध्यापक,निगडाळे शाळा)

Previous articleव्होडा फोन , आयडियाच्या मुख्य कार्यालयाच्या समोर भारतीय मजदूर संघाची निदर्शने; कामगारांना परत कामावर घेण्याची मागणी
Next articleविकास सोसायट्यांद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध व्यवसाय करावेत – सचिन सरसमकर