नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांना “आदर्श लोकप्रतिनिधी – आदर्श सरपंच” पुरस्काराने गौरव

नारायणगाव ,किरण वाजगे

नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे यांना पुणे येथे आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, मत्स्योत्पादन, वन राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते “आदर्श लोकप्रतिनिधी-आदर्श सरपंच” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, नवभारत वृत्तपत्र समूहाचे श्रीनिवास, श्री धनवट, राजेश वरलेकर उपस्थित होते.
दै. नवभारत व्रुत्तपत्रसमुह व दै. नवराष्ट्र यांच्यावतीने “आदर्श लोकप्रतिनिधी – आदर्श सरपंच” पुरस्कार पुणे येथील एस एम जोशी सभागृहात आज सोमवार दिनांक २८ रोजी दुपारी प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे, व्हा. चेअरमन किरण वाजगे, नारायणगावचे उपसरपंच आरिफ आतार, सदस्य गणेश पाटे, संतोष दांगट, राजेश बाप्ते, विकासनाना तोडकरी, अजित वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleयशदा,पुणे यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी मोफत ‘माहिती अधिकार कायदा’ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
Next articleनारायणगाव महाविद्यालयात जिल्हास्तरीय जल – साक्षरता कार्य शाळा उत्साहात संपन्न