यशदा,पुणे यांच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी मोफत ‘माहिती अधिकार कायदा’ प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

गणेश सातव,वाघोली

महाराष्ट्र शासन अंगीकृत असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी,पुणे(यशदा) यांच्यावतीने महाराष्ट्रातील पत्रकार बांधवांसाठी माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी माहिती अधिकार कायदा क्षेत्रात कार्यरत असणारे तज्ञ,अनुभवी कार्यकर्ते,यशदा येथील प्रशासकीय अधिकारी ‘प्रशिक्षक’ म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.पहिले जे ५० पत्रकार बांधव कार्यशाळा पुर्ण करण्याबाबतचे हमीपत्रासह रितसर नाव नोंदणी करतील त्यांनाचं या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी करुन घेतले जाईल.अशी माहिती प्रकल्प समन्वयक दादू बुळे यांनी दिली आहे.

सदर प्रशिक्षण कार्यशाळा रविवार,दि.१० एप्रिल,रविवार,दि.१७ एप्रिल व रविवार,दि.२४ एप्रिल २०२२
असे तीन रविवार,वेळ -: सकाळी ९.३० वाजता ते संध्याकाळ ५ वाजेपर्यंत ‘यशदा’ येथील प्रशिक्षण सभागृहात पार पडणार आहे.

यात सहभागी होणाऱ्या ५० पत्रकार बांधवांना यशदा तर्फे मोफत प्रशिक्षण देऊन सहभाग प्रमाण पत्र दिले जाईल.यासाठी मात्र
नाव नोंदणी केलेल्या सर्वचं ५० सदस्यांनी तीन ही रविवार प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थिती असणे बंधनकारक असणार आहे.शेवटच्या रविवारी प्रशिक्षणार्थी सदस्यांची परिक्षा होईल.

नाव नोंदणी करण्यासाठी संस्थेच्या rti@yashada.org
Email या मेल आय-डीवर ऑनलाइन फॉर्म भरुन सोबत पत्रकार असल्याचे ओळखपत्राची प्रत पाठवणे गरजेचे आहे.

माहिती अधिकार कायदा प्रशिक्षण कार्यशाळा नाव नोंदणीसाठी फॉर्म ‘यशदा’ संस्थेच्या संकेतस्थळावर(Website) ऑनलाइन फॉर्म उपलब्ध आहे.

संकेतस्थळ-: w.w.w.yashada.org(R.T.I Website वर पहावे)

टिप-: काही शंका असल्यास अथवा फॉर्म भरणेबाबत तांत्रिक अडचण आल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा.

राम करोटे, समन्वयक -: माहिती अधिकार केंद्र,यशदा,पुणे.
मो.नं-:9405432809

गणेश सातव,पत्रकार
मो.नं-:9822883390

Previous articleराजगुरूनगरच्या तरूणांची पक्षी सवंर्धनासाठी जन जागृती
Next articleनारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांना “आदर्श लोकप्रतिनिधी – आदर्श सरपंच” पुरस्काराने गौरव