मराठी पत्रकार संघाचा “शिव सन्मान 2022 “पुरस्कार भानुदास शिंदे यांना प्रदान

पुणे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, कोकण विभाग व ठाणे जिल्हा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून गार्डन लॉन गडकरी रंगायतन ठाणे येथे शिव सन्मान-2022 हा पुरस्कार सोहळा पार पडला.

शिक्षण व सामाजिक शेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या भानुदास शिंदे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद इंगळे यांचे हस्ते शिव सन्मान चिन्ह व शाल देवून सन्मानित करण्यात आले.प्रसंगी भानुदास शिंदे यांनी नातं रिचार्जे करा ही कविता सादर करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठाणे महानगरपालिका सहा. आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्या हस्ते नारी सन्मान-2022 हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कोकण विभाग व ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पुरस्कार सोहळा यशस्वीरित्या पार पडला. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी जितेंद्र पाटील प्रमोद घोलप कल्याणी भांगरे व मनस्वी चौधरी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सुबोध कांबळे यांनी केले.

Previous articleमातीशी इमान राखा,विषमुक्त शेती पिकवा- पद्मश्री राहीबाई पोपरे
Next articleपुण्यात आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन