पुण्यात आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

गणेश‌ सातव

पुणे- आदिवासी रुढी,परंपरा, कला व संस्कृती संवर्धनासाठी आदिवासी विभागाच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणारे पारंपरिक खाद्यपदार्थ, दागदागिने, वारली चित्रकला,गवत व बांबूच्या वस्तू,काष्ठशिल्पे,धातुकाम,मातीकाम,वनौषधी यांचे आकर्षक असणार आहे.

महोत्सवाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत अशी असणार असून, सर्वांना मुक्त, विनामूल्य प्रवेश आहे.ग्रामीण परंपरा व संस्कृती संवर्धनासाठी सर्वांनी नक्की अभ्यास भेट द्यावी असे आवाहन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

स्थळ-: आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,क्वीन्स् गार्डन, व्हि.व्हि.आय.पी विश्रामगृहा शेजारी,पुणे.

Previous articleमराठी पत्रकार संघाचा “शिव सन्मान 2022 “पुरस्कार भानुदास शिंदे यांना प्रदान
Next articleबाळकृष्ण काकडे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलच्या उपाध्यक्षपदी निवड