अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या अध्यक्षपदी शामराव कराळे

राजगुरूनगर -अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे ५४ वे अधिवेशन  पुणे येथील उदयान कार्यालय सदाशिव पेठ येथे संपन्न झाले.या वेळी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली.या मध्ये पुणे कथामालेचे शामराव शिवराम कराळे (माजी मुख्याध्यापक) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ज्येष्ठ समाजसेवक गांधीवादी विचारवंत सेवादलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा उपस्थित होते.मावळते अध्यक्ष श्री.लालासाहेब पाटील व इतर सर्व पदाधिकारी यांनी श्री.शामराव कराळे सर यांचे अभिनंदन केले.

नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वात कथामाला अधिक चांगल्या बप्रकारे काम करेल आणी देशात सर्वत्र तिचा प्रसार होईल.हा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

शामराव  कराळे सर हे मूळचे आंबेगाव तालुक्यातील कारेगाव येथील रहिवासी असुन पुणे मनपा विद्यानिकेतन क्रमांक ७ नारायण पेठ येथून सेवानिवृत्त झाले आहेत.गेली २५ वर्ष ते कथामालेचे सदस्य म्हणून काम करत आहेत.यापूर्वी त्यांनी साने गुरुजी कथामाला पुणे अध्यक्ष, अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे प्रमुख कार्यवाह व विश्वस्त म्हणून पदे भूषविली आहेत.

त्यांचे अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous articleदहा हजार रुपयांची थकबाकी माफ होणार, छोट्या व्यापाऱ्यांना होणार फायदा – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleबीजेएस विद्यालयात सुसज्ज आधुनिक संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न