बीजेएस विद्यालयात सुसज्ज आधुनिक संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न

गणेश सातव, वाघोली

वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयात अगस्त्या फाउंडेशन,स्मिथ ग्रुप, जॉन क्रेन कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सुसज्ज व आधुनिक संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रमास अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशनचे रिजनल हेड रमेश हिटनळी, प्रकल्प अधिकारी प्रकाश हांडे, हेड ऑफ एच.आर.बिझनेस सर्विस कुलदीप सिंग राठोर, प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, प्राचार्य संतोष भंडारी,पिंपरी विद्यालयाचे प्राचार्य दिलीप देशमुख,पर्यवेक्षक पांडुरंग पवार प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

या अंतर्गत विद्यालयास १२ संगणक संच ,एलसीडी प्रोजेक्टर वेब कॅमेरे व हेडफोन सह व आद्यावत संगणक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यावेळेस अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशनचे रिजनल हेड रमेश हिटनळी, हेड ऑफ एच. आर.बिझनेस सर्विस कुलदीप सिंग राठोर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणासाठी अगस्त्या फाउंडेशन स्मिथ ग्रुप व जॉन क्रेन यांनी केलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. तसेच बिजेएस मध्ये हा प्रकल्प सुरू केल्याबद्दल बी जे एस ला धन्यवाद दिले. प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळेस विद्यालयातील विद्यार्थी कु.श्रेया लोखंडे,कु.सृष्टी होळकर या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्मिता शिंदे व अशोक स्वामी यांनी तर आभार सौ. रेश्मा शितोळे यांनी मानले.

Previous articleअखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या अध्यक्षपदी शामराव कराळे
Next articleवाघोलीच्या बी.जे.एस विद्यालयास सर्वगुणसंपन्न शाळा तर शिक्षक अशोक स्वामी यांना उपक्रमशील शिक्षक व प्रवीण डोशी यांना गुणवंत सेवक पुरस्कार प्रदान