जऊळके बु’ येथील ठाकरवाडी शाळेतील विद्यार्थांना वाढदिवसा निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

राजगुरुनगर- आपल्या २१ व्या विवाह वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून मंगेश महाराज आडवळे यांनी शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यां सोबत केक कापुन आपला वाढदिवस साजरा केला . तसेच शाळेतील विद्यार्थांना अध्यापनासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप केला .

या प्रसंगी मंगेश महाराज आडवळे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात शिक्षणाचे महत्व किती आहे .आपण का शिक्षण घेतले पाहिजे या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रामचंद्र येवले सरांनी केले .

या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री सुरेश मेंगडे . दत्तात्रय टाकळकर चांगभलं गृप चे अध्यक्ष संतोष येवले, अविनाश आडवळे, अंगणवाडी ताई, सौ सुवर्णा कराळे उपस्थित होते . शाळेचे मुख्याध्यापक श्री क्षिरसागर सरांनी महाराजांचा सन्मान करून सर्वांचे आभार मानले .

Previous articleबहुळ सोसायटीच्या अध्यक्षपदी कान्हू वाडेकर व उपाध्यक्षपदी शशिकांत मोरे यांची बिनविरोध निवड
Next articleधामणीकरांच्या पिण्याच्या पाण्याची योजना आठवड्यात मार्गी लागणार – विवेक वळसे पाटील