बहुळ सोसायटीच्या अध्यक्षपदी कान्हू वाडेकर व उपाध्यक्षपदी शशिकांत मोरे यांची बिनविरोध निवड

चाकण- खेड तालुक्याच्या पुर्व भागातील महत्वाची मानली जाणारी बहुळ विविध विकास सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी चेअरमन व व्हाईस चेअरमनपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आला. चेअरमनपदी बाळासाहेब कान्हु वाडेकर व व्हाईस चेअरमनपदी सिद्धेगव्हाणचे मा. सरपंच शशिकांत प्रकाशराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शशिकांत मोरे यांनी यापूर्वी सिद्धेगव्हाणचे बिनविरोध सरपंच पद भुषविले आहे.

यावेळी नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा खेडचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी व्हाईस चेअरमन शशिकांत मोरे यांनी आमदार दिलीपराव मोहिते पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुळ विविध विकास सहकारी सोसायटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या विकासाचा आलेख उंचवण्यासाठी प्रयत्न करणार , नाबार्डच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी विजयी मिरवणूक काढली. बहुळ विविध विकास सहकारी सोसायटी इतिहासात दुसऱ्यांदा बिनविरोध झाली.

यावेळी पंचायत समितीच्या मा. सदस्या सौ. सुरेखाताई वाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धैर्यशील पानसरे, खरेदी विक्री संघाचे संचालक पठाणराव वाडेकर, मा. सरपंच राजाभाऊ साबळे, अॅड. सुखदेव तात्या पानसरे, संतोष साबळे,पै. अनिल साबळे, संदिप साबळे,उपसरपंच गणेश वाडेकर,धंनजय पठारे,बाळासाहेब आरेकर, बाळासाहेब वाडेकर, भरत काटकर, अशोक नाईक, सुधीर गंगावणे, सत्यवान काळे, बाळासाहेब मोरे, मारुती आप्पा वाडेकर, संजय आरेकर, विनायक पवार ,दिलीप मोरे,प्रदिप तांबे, विठ्ठल साळुंखे, नवनाथ पानसरे, अनिल मोरे, मनोज मोरे, कपिल मोरे इ. उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून मा.श्री. कांबळे साहेब यांनी काम पाहिले.

Previous articleहवेलीसाठी अप्पर तहसील कार्यालय, महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची विधानसभेत माहिती :  आमदार अशोक पवार यांच्या मागणीला यश
Next articleजऊळके बु’ येथील ठाकरवाडी शाळेतील विद्यार्थांना वाढदिवसा निमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप