तालुकास्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेत नारायणगाव नंबर दोन शाळेची उल्लेखनीय कामगिरी


नारायणगाव : (किरण वाजगे)
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील दहा कलमी उपक्रमांतर्गत झालेल्या तालुकास्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायणगाव नंबर २ शाळेचा conversation(संभाषण) प्रथम क्रमांक- अर्पिता वाकोडे आणि स्वरा फदाले, Dramatization (नाट्यीकरण) द्वितीय क्रमांक आणि poem/rhymes singing तृतीय क्रमांक-हर्षदा शिंगोटे, प्रणिता भोर, आदिती धोंगडे, प्राजक्ता बागुल, पूर्वा लाडके, स्वरा फदाले, त्रिशा पिंपळे, नम्रता पायाळ, सूनैना राजभर, लक्ष्मी बिष्ट या स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

यामध्ये conversation(संभाषण) याप्रकारासाठी अर्पिता वाकोडे आणि स्वरा फदाले, यांची जिल्हा स्तरावर निवड झाली या स्पर्धेसाठी वर्षा हांडे, आशा झोडगे, सुनिता डुंबरे, मोनाली गायकवाड, वर्षा पवार यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, सरपंच योगेश पाटे, केंद्रप्रमुख माधुरी शेलार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका आशा झोडगे यांनी दिली.

Previous articleपीएमपीएलची बस सेवा घोडेगाव पर्यंत सुरू ; कुंदन काळे यांच्या प्रयत्नांना यश
Next articleअकरावीत शिकणाऱ्या आदित्यचा भन्नाट प्रयोग